आर माधवन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी करतो फ्लर्ट? स्क्रीनशॉट व्हायरल

आर माधवन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी फ्लर्ट करतो अशी चर्चा सुरु आहे. त्यावर स्वत: आर माधवनने प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया तो काय म्हणाला...

आर माधवन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी करतो फ्लर्ट? स्क्रीनशॉट व्हायरल
R Madhavan
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 03, 2025 | 1:59 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेता आर माधवन एका मुलीसोबत फ्सर्ट करताना दिसत आहे. या स्क्रीनशॉटमुळे गदारोळ झाला आहे. आता यावर अभिनेता आर माधवनने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. यामागे नेमकं काय सत्य आहे चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉटमध्ये किस इमोजींना आर माधवनने प्रतिसाद दिली आहे. याविषयी बोलताना त्याचा एक व्हिडीओ रेडिटवर व्हायरल झाला आहे. “मी एक अभिनेता आहे. मला इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर अनेकजण मेसेज करतात. मी तुम्हाला एक थेट उदाहरण देतो. एका छोट्या मुलीने मला सोशल मीडियावर एक मेसेज केला होता की, “मी ही फिल्म पाहिली, मला खूप आवडली. ती मला म्हणाली की, “मुझे लगा आप एक शानदार एक्टर हैं, बहुत बढ़िया। आप मुझे प्रेरित करते हैं’… ” आणि त्यापुढे तिने खूप सारे हार्ट इमोजी आणि त्यासोबतच किस वाले इमोजी शेअर केले. आता जर एखादा फॅन माझ्याशी अशा पद्धतीने बोलत असेल, तर मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे ना. मी तिला रिप्लाय केला की, “मैं हमेशा आपका बहुत-बहुत धन्यवाद कहता हूं और यह आपकी बहुत दयालुता है, भगवान आपका भला करे…” हे माझं तिच्यासाठी उत्तर आहे. यानंतर तिनं माझ्या उत्तराचा स्क्रिनशॉर्ट घेतला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला” असे आर माधवमन म्हणाला.

या स्क्रीनशॉट विषयी बोलताना आर माधवन पुढे म्हणाला की, “आता लोक काय पाहतात? हार्ट इमोजी, किस इमोजी आणि प्रेमाच्या गप्पा… आणि मॅडीनं रिप्लाय केला आहे. माझा हेतू तिच्या हार्ट आणि किसच्या इमोजींना उत्तर देणे नव्हता. माझा हेतू तिच्या मेसेजला उत्तर देण्याचा होता. पण, ही एक छोटीसी गोष्ट आहे. तुम्ही फक्त ते इमोजी पाहता आणि बोलत आहाता. “ओह मॅडी यंग लडकियों से बात कर रहा है…” आता मला हीच भिती वाटायला लागली आहे की, सोशल मीडियावर मेसेज करताना त्याचा अर्थ कशा पद्धतीने घेतला जाईल? याची तुम्ही कल्पना करू शकता. दुसरं कुणीतरी या गोष्टीला कोणत्या नजरेतून पाहते याची कल्पना नाही करु शकत…”