
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेले अनेक दिवस कोरोना परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी पोस्ट शेअर करत होती. तिनं कोरोनामुळे अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

पण आता तिनं थोडा बदल करत स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

तिनं तिचा आधीचा आणि आताचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका बाजूला तिच्या बालपणाचा एक गोंडस फोटो आहे ज्यामध्ये ती मस्त पोज करताना दिसत आहे.

दुसर्या फोटोत ती पिवळ्या रंगाच्या प्रिंटेड आउटफिटमध्ये असून तिने टोपी देखील कॅरी केली आहे. तिचा हा फोटोही खूप सुंदर आहे. हे दोन्ही फोटो शेअर करत आलियानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - 'कारण आपण काय आहोत याने काही फरक पडत नाही'.

आलियाच्या या फोटोंवर आई सोनी राझदान यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं- "Aww Baby." याशिवाय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमानंही आलियाच्या या सुंदर फोटोवर कमेंट केली आहे. तिनं हार्ट इमोजी शेअर केली.

आलिया भट्टची इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंग जोरदार आहे. ती अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांची फॅन फॉलोइंग 50 दशलक्षाहून अधिक आहे. एकूण 53.3 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीचा एक भाग आहे. याशिवाय बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत ती ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहे.