Tiger Shroff: इथे मुलावर हल्ला झालाय आणि तू Event…जॅकी श्रॉफचा फडणवीसांसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच फॅन्स संतापले

Tiger Shroff Juhu: टायगर श्रॉफवर नुकताच हल्ला झाला. या हल्ल्याला एक दिवसही उलटलसा नव्हता तरीही वडिल जॅकी श्रॉफने एक सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली.

Tiger Shroff: इथे मुलावर हल्ला झालाय आणि तू Event...जॅकी श्रॉफचा फडणवीसांसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच फॅन्स संतापले
| Updated on: Oct 20, 2026 | 8:11 AM

Tiger Shroff Firing: जॅकी श्रॉफ यांनी सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी बोरिवली येथे एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत त्यांचा मुलगा टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली. प्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या नावाने एका रस्त्याचे नामकरण करण्याच्या कार्यक्रमात ही भेट झाली. दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी अनेक दशके आपल्या गाण्यांनी संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जुहू येथील निवासस्थानाजवळील एका रस्त्याला ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जितेंद्र सिंह आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. आदल्या दिवशीच त्यांचा मुलगा टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने, जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर लगेचच जॅकी श्रॉफ यांची एका सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. नुकत्याच झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेत, मोटारसायकलवरील तीन जणांनी अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार केला होता. या घटनेत टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला, तर जॅकी श्रॉफ यांचा मुलगा सुखरूप आहे. मुंबईतील जुहू भागातील एका फुटबॉल क्लबमधून टायगर श्रॉफ बाहेर पडत असताना ही घटना घडली.

Loading...

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना सोमवारी कोटा येथे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यांना मुंबई पोलिसांच्या ४८ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आले. आरोपींपैकी एक जण आधीपासूनच मुंबईत राहत होता. आरोपींची ओळख सोनीपत येथील १२वी उत्तीर्ण फूल सिंग नरेश, सोनीपत येथील ९वी उत्तीर्ण रेहान रशीद्दीन आणि मुंबईतील रॅपिडो चालक हृतिक अशी पटली आहे. गेल्या रविवारी अभिनेता टायगर श्रॉफ ज्या मैदानावर खेळत होता, त्याच मैदानाची आरोपींनी पाहणी केली होती. त्यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, ११ सप्टेंबर रोजी एक मोटारसायकल खरेदी केली होती. तिन्ही आरोपींपैकी हृतिक बाईक चालवत होता, तर रेहान आणि फूल सिंग यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करून अटक टाळण्यासाठी पळून जाण्याचा कट रचला होता. ते बाईकवरून अंधेरी स्टेशनवर पोहोचले, जिथून त्यांनी कांदिवलीला जाणारी लोकल ट्रेन पकडली. कांदिवलीला पोहोचल्यानंतर त्यांनी एक कॅब बुक केली आणि ते सुरतला गेले. सुरतहून ते कोटाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले, परंतु कोटा जंक्शनवर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून एक मोबाईल फोन जप्त केला आहे. फूल सिंगवर यापूर्वी कार चोरीचा गुन्हा दाखल आहे, तर रेहानवर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us