
Suraj Chavan Wedding : ‘बिग बॉस 5’ चा विनर सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याचं लग्न झालं. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूरज याच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पण त्यामधील एक व्हिडीओ असा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर संतापली… लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर, जान्हवी हिने माईक घेतला आणि म्हणाली, ‘आपण याठिकाणी लग्नासाठी जमलोय त्यामुळे सहकार्य करू…’ सध्या जान्हवी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लग्नाआधीच्या विधी सर्व मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडल्या.. पण लग्न ठिकाणी चाहत्यांनी मोठी गर्दी केली.. ज्यामुळे जान्हवी हिचा संताप अनावर झाला. राग व्यक्त करत जान्हवी म्हणाली, ‘आपण लग्नाला आलो आहोत… त्याचं लग्न तरी लागू द्या… त्याचं लग्न वेळेत लागू नये असं तुम्हाला वाटत आहे का? सूरज आतमध्ये वैतागून बसलाय…. प्लीज… थोडावेळ शांत बसा… समजून घ्या… मी तुम्हाला सर्वांना हात जोडून नमस्कार करते… आता सर्वांचं डोकं फिरलं आहे… सूरज याला बाहेर येऊ द्या…’
जान्हवीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हात जोडून नमस्कार नाही पाया पडते अस म्हणायचं होत का?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जान्हवी चिडली बिगबॉसचं रुप बघायला भेटलं…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘झालं इथेपण सुरू हीच, बोलवतात कशाला इथे, सगळी गर्दी सुरजसाठी आली आहे, तुझं एकायला नाही…’
सांगायचं झालं तर, सूरज याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर याच्यासोबतच धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील… हे ‘बिग बॉस’ सीझन 5 ते सर्व स्पर्धक उपस्थित होते. तर सूरज याच्या लग्नाच्या तयारीसाठी अंकिता वालावलकर हिने मदत केली. पण ती लग्नात येऊ शकली नाही.
सूरज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरज याने स्वतःच्या बळावर सर्वकाही मिळवलं आहे. आता सूरज याने त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सूरज याच्या पत्नीचं नाव संजना आहे आणि दोघांचं लव्ह मॅरिज आहे.