तिच्याकडे चुकूनही परत जाऊ नकोस..; बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला जान्हवी कपूरचा स्पष्ट सल्ला

Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही अभिनेता वेदांग रैनाला डेट करत होती. या दोघांचं जानेवारी महिन्यात ब्रेकअप झालं. त्यानंतर आता जान्हवीने वेदांगला स्पष्ट सल्ला दिला आहे.

तिच्याकडे चुकूनही परत जाऊ नकोस..; बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला जान्हवी कपूरचा स्पष्ट सल्ला
खुशी कपूर, वेदांग रैना, जान्हवी कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2026 | 9:04 AM

Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री खुशी कपूर आणि अभिनेता वेदांग रैना यांच्या ब्रेकअपबद्दल जान्हवीने नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे, तिने वेदांगला थेट खुशीकडे पुन्हा परत न जाण्याचा सल्ला दिला आहे. करण जोहरच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण 9’ या शोमध्ये जान्हवीने हे वक्तव्य केलं. यावेळी तिच्यासोबत अभिनेता वरुण धवनही उपस्थित होता. शोमधील रॅपिड फायर राऊंडदरम्यान जान्हवीने दिलेल्या उत्तरांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

वेदांगला जान्हवीने काय दिला सल्ला?

‘कॉफी विथ करण 9’च्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरने जान्हवीला वेदांग रैनाला डेटिंगबाबत कोणता सल्ला देशील, असा प्रश्न विचारला. यावर जान्हवी म्हणाली, ‘कदाचित त्याने जास्त विचार करणं बंद करायला हवं.’ यानंतर वरुण धवनने वेदांगच्या चित्रपटाच्या नावाचा संदर्भ देत ‘मैं वापस आऊंगा’ असं मजेशीरपणे म्हटलं. वरुणच्या या वक्तव्यावर जान्हवीने लगेच प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘नाही, काही हरकत नाही. परत येण्याची गरज नाही. जास्त विचार करणं बंद कर.’ जान्हवीच्या या उत्तरामुळे शोमध्ये एकच हशा पिकला. मात्र, तिच्या या वक्तव्याचा अर्थ खुशी आणि वेदांग यांच्या पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचा संकेत म्हणून लावला जात आहे.

Loading...

बहिण खुशीला डेटिंगबाबत काय सल्ला दिला?

यानंतर करण जोहरने जान्हवीला तिची बहीण खुशी कपूर हिला डेटिंगबाबत काय सल्ला देशील, असा प्रश्न विचारला. यावर जान्हवी म्हणाली, ‘मला वाटत नाही की तिला सध्या कोणत्याही सल्ल्याची गरज आहे. ती ठीक आहे.’ तिच्या या उत्तरानेही चाहत्यांचं लक्ष वेधलं. एकीकडे वेदांगला जास्त विचार न करण्याचा सल्ला, तर दुसरीकडे खुशीला सध्या सल्ल्याची गरज नसल्याचं म्हणत जान्हवीने तिची बाजू मांडली.

खुशी कपूर आणि वेदांग रैना यांची ओळख झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलं. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे काही सांगितलं नव्हतं. दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ब्रेकअपचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आता जान्हवीच्या वक्तव्यामुळे खुशी आणि वेदांग यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us