‘केएल राहुलची रिप्लेसमेंट मिळाली’, ‘क्रिकेटर’ जान्हवीचा फोटो पाहून चाहत्यांचे भन्नाट कमेंट्स

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 12:42 PM

'सॉरी विराट..'; हातात बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या जान्हवीच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

'केएल राहुलची रिप्लेसमेंट मिळाली', 'क्रिकेटर' जान्हवीचा फोटो पाहून चाहत्यांचे भन्नाट कमेंट्स
Janhvi Kapoor
Image Credit source: Instagram

मुंबई: अभिनेत्री जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीला अनेकदा तिच्या अभिनयकौशल्यावरून ट्रोल केलं गेलं. पण गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल, गुड लक जेरी आणि मिली यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची चुणूक दाखवली. आता आगामी चित्रपटात ती एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या सेटवरील तिने एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जान्हवीच्या हातात क्रिकेटची बॅट आणि खांद्यावर किनेसिओ टेप्स पहायला मिळत आहेत. ‘एक मिनिट झालाय’ असं कॅप्शन लिहित तिने हा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘सॉरी विराट..’ चाहते करतायत कमेंट

जान्हवीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिच्या या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सॉरी विराट.. जान्हवी माझी आवडती क्रिकेटर आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आता टीम इंडियाला हिची गरज आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘केएल राहुलची रिप्लेसमेंट मिळाली’ अशीही मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली. ‘क्रिकेटमध्ये कधीपासून..’ असा प्रश्नही नेटकऱ्याने विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे. राजकुमार राव आणि जान्हवीने याआधी ‘रुही’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरन शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्यावर अद्याप निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI