गाणं पाहिजे तर असं, ज्याच्याशिवाय जन्माष्टमी कधीच पूर्ण होत नाही, सुरु होताच लोक थेट ठेका धरतात

या गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही जन्माष्टमी. 14 वर्षांपासून प्रत्येक जन्माष्टमीच्या सणामध्ये याच गाण्याची गोविंदामध्ये असते प्रचंड क्रेझ. आजही हे गाणं जन्माष्टमीला वाजतच.

गाणं पाहिजे तर असं, ज्याच्याशिवाय जन्माष्टमी कधीच पूर्ण होत नाही, सुरु होताच लोक थेट ठेका धरतात
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 03, 2026 | 6:31 PM

जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव म्हटलं की भक्ती, जल्लोष, ढोल-ताशे आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून जातं. या उत्सवात काही गाणी मात्र दरवर्षी हमखास ऐकायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे ‘गो गो गो गोविंदा’. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड!’ या चित्रपटातील हे गाणं आजही दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहात वाजवलं जातं.

या गाण्याला मीका सिंह आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला असून, संगीत हिमेश रेशमिया यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांनी विशेष सहभाग घेतला होता. दोघांच्या भन्नाट डान्समुळे गाण्याला आणखी रंगत आली. उत्साही संगीत, गोविंदा पथकांचा जल्लोष आणि दहीहंडीचा माहोल यामुळे हे गाणं सणासाठी जणू खासच बनलं आहे.

दहीहंडीच्या जल्लोषात आजही गाण्याची क्रेझ

‘गो गो गो गोविंदा’ हे गाणं प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्याची लोकप्रियता कायम आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये डीजेवर हे गाणं लागलं की तरुणाईसह गोविंदा पथकांमध्येही उत्साह संचारतो. गाण्याची तालबद्ध चाल आणि दमदार सादरीकरणामुळे ते आजही सेलिब्रेशनसाठी आवडतं गाणं ठरतं.

गाणं आणि चित्रपट दोन्ही ठरले खास

धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि माणसाच्या विचारस्वातंत्र्यावर भाष्य करणाऱ्या ‘ओह माय गॉड!’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच चित्रपटातील ‘गो गो गो गोविंदा’ने मात्र दहीहंडीच्या उत्सवात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

आजही जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा उत्सव रंगला की या गाण्याची धून ऐकू येते. त्यामुळे ‘गो गो गो गोविंदा’ हे केवळ चित्रपटातील गाणं राहिलेलं नसून दहीहंडीच्या जल्लोषाचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. दहीहंडीचा सण जवळ आला की या गाण्याची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढते. सोशल मीडियावर देखील या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स व्हिडीओ तयार होतात. कोणतीच जन्माष्टमी या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हे गाणं ऐकू जरी आलं तरी लोक धरतात ठेका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us