Javed Akhtar : हिंदू लोक स्वतःच्याच परंपरेवर टीका करतात, पण मुस्लिम…जावेद अख्तर यांचं वादग्रस्त वक्तव्य

Javed Akhtar : जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी एका मुलाखतीत हिंदू आणि मुस्लिमांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Javed Akhtar : हिंदू लोक स्वतःच्याच परंपरेवर टीका करतात, पण मुस्लिम...जावेद अख्तर यांचं वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Oct 04, 2026 | 8:12 PM

जावेद अख्तर रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६ रोजी ८१ वर्षांचे झाले असून त्यांच्या पत्नी, शबाना आझमी यांनी मुंबईतील त्यांच्या सुरुवातीच्या खडतर दिवसांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम समुदायांच्या दृष्टिकोनांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.

जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत

Loading...

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ‘बघा… हे जे अर्फा खानम शेरवानी, मोहम्मद झुबेर, असदुद्दीन ओवैसी आणि इतर लोक आहेत, जेव्हा हिंदू समाजातील कोणत्याही वाईट किंवा सामाजिक वाईट कृत्याचा विषय येतो, तेव्हा ते मोठ्याने बोलतात. त्यांचा आवाज खूप उंच होतो. पण जसा प्रश्न त्यांच्या स्वतःच्या समाजाकडे वळतो… त्यांच्या समाजातील समस्यांकडे… तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात,  शांतता पसरते. हिंदू समाजातील अनेक लोक स्वतःच्या परंपरा आणि चालीरीतींवर टीका करतात. ते स्वतःवरच टीका करतात. पण मुस्लिम समाजात असे खूप कमी लोक आहेत जे आपल्या समाजातील वाईट गोष्टींबद्दल उघडपणे बोलतात.’

‘सत्य हे आहे की, या देशात असे अनेक लोक आहेत जे हिंदू असूनही स्वतःला नास्तिक मानतात. ते हिंदू कट्टरतावादी आणि मूलतत्त्ववादी गटांच्या कारवायांना उघडपणे आणि निर्भयपणे विरोध करतात. मला याचं खूप दुःख आहे की, आपल्याच समाजातील उणिवा, दोष किंवा कमकुवतपणा दाखवून देण्यास तयार असलेले मुस्लिम खूप कमी आहेत.’

जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘मी नास्तिक आहे, पण हेही एक खरं आहे की, माझा जन्म मुस्लिम समाजात झाला आहे, त्यामुळे समाजातील वाईट गोष्टी आधी उघड करणं हे माझं कर्तव्य आहे. भारतात असे अनेक हिंदू आहेत जे आपापल्या प्रश्नांवरून भांडतात, पण किती मुस्लिम त्यांच्यासोबत भांडतात? आमच्यात सर्व काही ठीक आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, हे चालणार नाही. त्यामुळे हे आधी निदर्शनास आणून देणं हे माझं कर्तव्य आहे.’

जावेद अख्तर यांचं लग्न आणि मुलं

शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी, जावेद अख्तर यांचं लग्न पटकथा लेखिका हनी इराणी यांच्याशी झालं होतं. त्या दोघांनी १९७२ मध्ये लग्न केलं आणि त्यांना चित्रपट निर्माती झोया अख्तर आणि अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर ही दोन मुलं आहेत. जावेद आणि हनी १९७८ मध्ये वेगळे झाले आणि १९८५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १९८४ मध्ये त्यांनी शबाना यांच्यासोबत दुसरं लग्न केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us