‘मी मॅनेज करत नाही…’ माही बिग बॉसच्या घरात असताना मुलगी ताराबद्दल जयचा मोठा खुलासा

माही वीज बिग बॉसमध्ये असताना, जय भानुशाली मुलगी तारासोबत वेळ घालवतोय, त्यांचे वडील-मुलीचे नाते अधिक घट्ट होत आहे. माहीने शो जिंकावा आणि आपल्याला तारासोबत अधिक वेळ मिळावा, अशी जयची इच्छा होती. बिग बॉसमध्ये मात्र, माही आणि उदिती, अरिशफा यांच्यातील मैत्रीत तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. गेमच्या गतीमुळे त्यांच्या नात्यात आव्हानं निर्माण झाली आहेत.

‘मी मॅनेज करत नाही...’ माही बिग बॉसच्या घरात असताना मुलगी ताराबद्दल जयचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 06, 2026 | 4:20 PM

अभिनेत्री माही विज सध्या बिग बॉस 20 मध्ये दिसत आहे. माही आणि जय भानुशाली यांनी याच वर्षी जानेवारीत विभक्त होण्याची घोषणा केली होती. सध्या माही बिग बॉसच्या घरात असल्यामुळे त्यांची मुलगी तारा जयसोबत आहे. अशा परिस्थितीत मुलीची जबाबदारी तो कशी सांभाळतोय, असा प्रश्न जयला विचारण्यात आला. त्यावर त्यने मनमोकळएपणाने उत्तर दिलं.

ताराची काळजी घेण्याबद्दल काय म्हणाला जय ?

Loading...

एंटरटेनमेंट टाइम्सशी बोलताना जय म्हणाला, “मी काही मॅनेज करत नाहीये. उलट मी तारासोबत या वेळेचा आनंद घेत आहे. मला वाटतंय की वडील आणि मुलीचं बॉन्डिंग आता आणखी मजबूत झालं आहे.” माहीने बिग बॉसच्या घरात जावं, अशी आपली इच्छा का होती, यामागची दोन कारणंही जयने सांगितली. तो म्हणाला, “माहीने बिग बॉसमध्ये जाऊन शो जिंकावा, अशी माझी इच्छा होती. दुसरं म्हणजे मला माझ्या मुलीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळावी.” असंही त्याने नमूद केलं.

माही आणि जयची वेगळं होण्याची घोषणा

माही आणि जय यांनी जानेवारी 2026 मध्ये सोशल मीडियावर संयुक्त निवेदन शेअर करत विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आपल्या मुलांसाठी दोघेही कायम एकमेकांना साथ देतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच, तारा, खुशी आणि राजवीर या तिन्ही मुलांचं संगोपन दोघे मिळून करतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

एकीकडे माही बिग बॉसच्या घरात आपला गेम खेळत असताना, जय मुलगी तारासोबत वेळ घालवत आहे. सोशल मीडियावरही तो तारासोबतचे अनेक फोटो आणि पोस्ट शेअर करताना दिसतो.

माही आणि उदितीमध्ये वाढला तणाव

बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच माही आणि उदिती एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. दोघी एकमेकींना सतत सपोर्ट करत आणि अनेकदा एकत्र गेम खेळताना दिसत होत्या. मात्र, आता त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. सध्या उदिती घराची कॅप्टन आहे. तिने माहीला चॉपिंग करण्यास सांगितलं असता, माहीने आपल्याला चॉपिंग येत नसल्याचं सांगत ते करण्यास नकार दिला. त्यानंतर उदितीने माही हे जाणूनबुजून करत आहे का, असा सवाल केला. यावर माहीने, “गोष्टी पुढे नेऊ नकोस आणि इथून जा,” असं म्हटलं. त्यावर उदितीने माहीला बोलण्याची शिस्त शिकण्यास सांगितलं.

तर दुसरीकडे अरिशफा खानदेखील आता माही आणि काजी तौकीरपासून काहीशी दूर राहताना दिसत आहे. अरिशफा आणि उदिती आपलं जेवण डायनिंग टेबलवरून घेऊन गार्डन एरियात जाताना दिसली, तर माही मात्र डायनिंग टेबलवरच जेवत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us