“लोक मला ‘मटका’ म्हणून चिडवायचे”; ‘जर्सी’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने केला बॉडी शेमिंगचा सामना

| Updated on: Apr 24, 2022 | 6:02 PM

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) 'जर्सी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मृणालने अभिनेता शाहिद कपूरसोबत भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल बॉडी शेमिंगबद्दल व्यक्त झाली.

1 / 5
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'जर्सी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मृणालने अभिनेता शाहिद कपूरसोबत भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल बॉडी शेमिंगबद्दल व्यक्त झाली.

2 / 5
आजवर इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. काहींनी अशा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं, तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष करत सकारात्मक विचार केला. मृणाललाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता.

3 / 5
मटका म्हणत लोक माझी खिल्ली उडवायचे, असं मृणालने सांगितलं. अनेकांनी तिला विविध सल्ले दिले. मात्र मृणालने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत स्वत:कडे सकारात्मकतेने पाहण्यावर भर दिला.

4 / 5
"झिरो साइज फिगर असणं गरजेचं नाही. मला असं वाटतं की तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. तुमची फिगर झिरो साइज असेल पण तुम्ही निरोगी आणि स्वस्थ नसाल तर काय उपयोग. हे सर्व तुमच्या शरीराच्या प्रकारावर अवलंबून आहे. आपल्या सर्वांचे शरीराचे प्रकार वेगवेगळे आहेत," असं मृणाल म्हणाली.

5 / 5
"माझ्यासारखीच बॉडी टाईप असणाऱ्या अनेक मुली आहेत. त्यांनाही मी हेच सांगू इच्छिते की हे नॉर्मल आहे. तुमच्या शरीराचा आकार हा मटक्यासारखा असेल तर त्यात काहीच वाईट नाही", असं ती पुढे म्हणाली.