Pathaan: शाहरुखच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं; ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी SRK-जॉन अब्राहममध्ये वाद?

याआधी 'बेशर्म रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वाद झाला. त्यानंतर आता जॉन अब्राहम हा पठाणच्या ट्रेलरवर नाराज असल्याचं कळतंय.

Pathaan: शाहरुखच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं; पठाणच्या प्रदर्शनापूर्वी SRK-जॉन अब्राहममध्ये वाद?
Shah Rukh Khan and John Abraham
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2023 | 9:23 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरून बरेच वाद होत आहेत. याआधी ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वाद झाला. त्यानंतर आता जॉन अब्राहम हा पठाणच्या ट्रेलरवर नाराज असल्याचं कळतंय. शाहरुख आणि जॉनमध्ये काही आलबेल नसल्याचं समोर येतंय. या चर्चांदरम्यान आता जॉनने प्रतिक्रिया दिली आहे.

जॉन अब्राहमने काय लिहिलं?

जॉनची ही पोस्ट वाचून त्याच्यात आणि शाहरुखमध्ये कोणतेच मतभेद नसल्याचं स्पष्ट होतंय. त्याचसोबत पठाणच्या ट्रेलरवरही तो नाराज नसल्याचं दिसतंय. जॉनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘सिनेसृष्टीतील माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हा क्षण खूप खास आहे. पठाणच्या ट्रेलरवर तुम्ही केलेला प्रेमाचा वर्षाव अद्भुत आहे. या चित्रपटासाठी फार मेहनत घेतली आहे. हा खूप मोठा चित्रपट आहे. आदिने मला नेहमीच चांगल्या भूमिका दिल्या आहेत. सिद्धार्थ आनंदने माझ्या भूमिकेसोबत जे केलंय, ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला पठाणविषयी खूप काही बोलायचं आहे. पण 25 जानेवारीपर्यंत वाट पाहुयात.’

वादाची चर्चा का होतेय?

जॉन अब्राहम याने एका हेल्थकेअर ब्रँडच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला शाहरुखविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जॉनने उत्तर देणं साफ टाळलं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळला. त्यामुळे जॉन आणि शाहरुखमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पठाण या चित्रपटात शाहरुख, दीपिका आणि जॉनसोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.