Kajol | “मी माझ्या पतीविरोधात खटला दाखल करेन”; काजोलच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

वेब सीरिजशिवाय काजोल नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटातही झळकली आहे. सुजॉय घोष, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि अमित आर. शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या विविध कथा या एका चित्रपटात पहायला मिळत आहेत.

Kajol | मी माझ्या पतीविरोधात खटला दाखल करेन; काजोलच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
Kajol and Ajay Devgn
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2023 | 1:40 PM

मुंबई : अभिनेता काजोल आणि अजय देवगण यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘पॉवर कपल’ मानलं जातं. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. फेब्रुवारी 1999 मध्ये या दोघांनी लग्न केलं. काजोल आणि अजयला निसा आणि युग अशी दोन मुलं आहेत. एकीकडे अजय बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत असताना दुसरीकडे काजोल ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलला तिच्या या सीरिजमधील भूमिकेवरून मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

“जर तुला एखाद्या व्यक्तीविरोधात खटला दाखल करायचा असेल, तर ती व्यक्ती कोण असेल”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर कसलाही विचार न करता काजोलने थेट पती अजय देवगणचं नाव घेतलं. “मी अजयविरोधात खटला दाखल करेन”, असं ती म्हणाली. याविषयी तिने पुढे सांगितलं, “मी अजयविरोधात खटला दाखल करेन आणि त्यासाठी मला कोणतंच कारण देण्याचीही गरज नाही. त्याचं पती असणं हे कारणच खटला दाखल करण्यासाठी पुरेसं आहे. त्याचा स्वभाव मी चांगल्याप्रकारे ओळखते. त्यामुळे तोसुद्धा माझे सर्व आरोप कबूल करणार.”

याआधीही एका कार्यक्रमात घरातील सर्व निर्णय कोण घेतं, असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला होता. त्यावर अजयने भन्नाट उत्तर दिलं होतं. त्याच्या या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अजय उत्तर देण्याआधीच काजोल म्हणते, “अजिबात नाही, याचं उत्तर मी देते.” यावेळी तिच्या बाजूलाच बसलेला अजय मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला विचारतो, “तुमचं लग्न झालंय का?” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. “तर मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हीसुद्धा देऊ शकता. ज्यांचं लग्न झालंय ते सर्वजण याचं उत्तर देऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर एकच असेल. प्रत्येक जण याचं उत्तर एकसारखंच देईल”, असं अजय पुढे म्हणतो.

वेब सीरिजशिवाय काजोल नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटातही झळकली आहे. सुजॉय घोष, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि अमित आर. शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या विविध कथा या एका चित्रपटात पहायला मिळत आहेत.