Kajol : ज्युनियर अजय देवगणला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले ‘विमल पान मसाल्याचा मुलगा’

मुंबईत नुकताच 'गणपत' या चित्रपटाचा स्क्रीनिंग पार पडला. यावेळी अभिनेत्री काजोलने मुलगा युगसोबत हजेरी लावली होती. स्क्रिनिंगला जाताना काजोलने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. यावेळी तिच्या मुलाचाही व्हिडीओ शूट करण्यात आला. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Kajol : ज्युनियर अजय देवगणला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले विमल पान मसाल्याचा मुलगा
Kajol with son Yug
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2023 | 3:13 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘दो पत्ती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच तिने टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांच्या ‘गणपत’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी तिच्यासोबत मुलगा युगसुद्धा होता. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्क्रिनिंगला जाण्याआधी काजोलने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्यावेळी तिचा मुलगा बाजूलाच पॉपकॉर्न खाण्यात व्यस्त दिसून येतो. काजोल त्याला जवळ बोलावून सोबत फोटोसाठी उभं करते. मायलेकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अर्थातच या व्हिडीओमध्ये काजोल आणि अजय देवगणचा मुलगा युग हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. काजोलची मुलगी न्यासा अनेकदा पापाराझींसमोर येते. मात्र युग लहान असल्याने सहसा त्याला कॅमेरासमोर येऊ दिलं जात नाही. आता पहिल्यांदाच काजोल युगसोबत फोटोसाठी उभी राहिली. यावेळी अनेकांनी त्यांच्या वागण्यावरून कमेंट्स केल्या आहेत.

पहा व्हिडीओ

‘याचे डोळे हुबेहूब अजय देवगणसारखेच आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा ज्युनिअर अजय देवगणच आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी युगला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. ‘विमल पान मसाल्याचा मुलगा’ असा टोला नेटकऱ्यांनी लगावला. तर ‘याला झोपेतून कोणीतरी उठवा’, असंही काहींनी म्हटलं आहे. अजय देवगणला अनेकदा पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी ट्रोल केलं जातं. यामुळे त्याच्या मुलालाही नेटकऱ्यांनी त्यावरून कमेंट केली.

काजोलच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘दो पत्ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. काजोल तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारतेय. त्यामुळे तिच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. याआधी तिने ‘द ट्रायल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. यामध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत काजोल इंडस्ट्रीमध्ये वाढणारं पापाराझी कल्चर आणि सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त केली जाणारी ढवळाढवळ यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. फोटोग्राफर्सनी सेलिब्रिटींचे फोटो काढणं हा त्यांच्या कामाचा एक भाग असला तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीचा प्रत्येक ठिकाणी पाठलाग केला जाऊ नये, असं तिने स्पष्ट केलं होतं.