
Bollywood Actress Extra Marital Affair : हिंदी सिनेविश्वातील अशा अभिनेत्रीबद्दल चर्चा सुरु आहे, जिने विवाहित असताना देखील दिलीप कुमार यांच्यासोबत विवाहबाह्यसंबंध ठेवले. सांगायचं झालं तर, बहिणीच्या नवऱ्यासोबत अभिनेत्रीने लग्न केलं होतं… पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 90 वर्षांचे दिलीप कुमार अभिनेत्रीला ओळखू देखील शकले नाहीत… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेत्री कामिनी कौशल होत्या..
कामिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांचं निधन झालं. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे. कामिनी कौशल या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण एक काळ असा होता, जेव्हा कामिनी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या होत्या.
कामिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बहिणीच्या नवऱ्यासोबत त्यांनी लग्न केलं होतं. सांगायचं झालं तर, कामिनी यांच्या बहिणीचं रस्ते अपघातात निधन झालं होतं.., बहिणीच्या दोन मुली देखील होत्या. याच कारणामुळे, कामिनी यांच्यावर बहिणीच्या नवऱ्यासोबत लग्न करण्यासाठी कुटुंबियांनी दबाव टाकला… तर मुलींसाठी देखील कामिनी यांनी मनाविरुद्ध लग्न केलं.
लग्नानंतर कामिनी मुंबई राहू लागल्या. तर त्यांचे पती बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य अभियंता म्हणून काम करू लागले. कामिनी कौशल यांनी तीन मुलांना जन्म दिला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ सिनेमात काम करत असताना दिलीप कुमार आणी कामिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं… Dilip Kumar: Peerless Icon Inspiring Generations पुस्तकात लिहील्यानुसार, कामिनी या दिलीप कुमार यांचं पहिलं प्रेम होत्या.
पण दोघांच्या अफेअरबद्दल जेव्हा कामिनी यांच्या भावाला कळलं, तेव्हा त्यांचा भाऊ बंदूक घेऊन सेटवर पोहोचले आणि त्यांनी दिलीप कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली… दिग्दर्शक पीएन अरोरा यांनी खुलासा केला की, कामिनी कौशल यांचा भाऊ सैन्यात होता आणि त्यांनी दिलीप कुमार यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. कामिनी कौशल विवाहित होत्या आणि दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे संबंध विवाहबाह्य होते. त्यामुळे कामिनी यांच्या भावाला राग आला होता.
कामिनी कौशल यांनी 2014 मध्ये एका मॅगजीनला सांगितलं होतं की, दिलीप साहेबांनी त्यांच्या चरित्रात लिहिले आहे की त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर ते पूर्णपणे कोलमडलं होतं. कामिनी यांनी सांगितल्यानुसार, कामिनी यांना देखील मोठा धक्का बसला होता… पण कामिनी यांना पतीची फसवणूक करायची नव्हती..