कंगणा राणावतने पीएम मोदींची प्रभू रामाशी केली तुलना, ट्रोल झाल्यानंतर पाहा काय म्हणाली ?

नेहमी वादात रहाणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत हीने आता नवा वाद निर्माण केला आहे. तिने चार राज्याच्या निवडणूकांचा निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर केला आहे. आणि त्यांची तुलना प्रभू रामाशी केल्याने वाद निर्माण झाला आहे.

कंगणा राणावतने पीएम मोदींची प्रभू रामाशी केली तुलना, ट्रोल झाल्यानंतर पाहा काय म्हणाली ?
Kangana twit about pm modi
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 03, 2023 | 8:16 PM

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : भाजपाला विधानसभेत तीन मोठ्या राज्यात विजय मिळाला आहे. कॉंग्रेसला केवळ तेलंगणात यश मिळाले आहे. भाजपाकडून या यशाचं सेलिब्रेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनतेचे आभार मानले आहे. भाजपाचे तीन राज्यात सरकार येणार हे स्पष्ट होताच अभिनेत्री कंगणा राणावत हीने लागलीच ट्वीट केले. तिने पीएम मोदी यांचा फोटो शेअर करीत त्यावर कॅप्शन लिहीली की, ‘राम आए हैं, #ElectionResult या पोस्टवर अनेक युजरनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. हिंदूच्या देवतांशी तुलना करणे योग्य आहे का ? त्यानंतर तिने आणखी एक ट्वीट करुन उत्तर दिले.

बॉलिवूड अभिनेत्री हीचे भाजपा प्रेम सर्वश्रृत आहे. तिने नेहमीच राजकीय ट्वीट करुन अनेक वाद ओढावून घेतले आहेत. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू रामाशी करताच तिला ट्रोल करायला सुरुवात झाली. एका युजरने म्हटले की, काय खरंच हिंदूच्या देवतेशी तुलना करीत आहेत…काय हिंदू धर्म यास परवानगी देतो का ? यावर कंगना हीने ट्वीट करीत लिहीले की,’ हा, यास परवानगी आहे. गीतेत श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे की जो माझा भक्त आहे. माझ्या भक्ती लीन झाला आहे तो मीच आहे. त्याच्यात आणि माझ्यात काहीच अंतर नाही. एवढे क्यूट चिल भगवान आहेत आमचे. कोणी गळा कापणार नाही, तुम्ही पण या आमच्या टीम मध्ये !’

तिने पुढे लिहीलेय की, ‘तसेच माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की अयोध्यात मोदीजी रामजी को लेके आए हैं तो जनता उनको लेके आयी है..परंतू तुम्ही जे समजला तेही चूक नाही! ‘

येथे ट्वीट पाहा –

आगामी चित्रपट

अभिनेत्री कंगणा राणावत हीचा नुकताच ऑक्टोबरमध्ये रिलीज झालेला तेजस चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला आहे. लवकरच पॉलिटीकल ड्रामा ‘इमर्जन्सी’ दिसणार आहे. यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपडे, महिमा चौधरी आणि सतीश कौशिक असे सहकलाकार दिसणार आहे.

येथे ट्वीट पाहा –