Kangana Ranaut | कंगना राणावत कडाडली, थेट रणबीर कपूर याला म्हणाली, पांढरा उंदीर, वाचा काय घडले?

| Updated on: Jun 10, 2023 | 6:03 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या विधानामुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा कंगना राणावत ही मोठ्या वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडचे चित्रपट आणि कलाकार असतात. धक्कादायक विधान कंगना हिने केले आहे.

Kangana Ranaut | कंगना राणावत कडाडली, थेट रणबीर कपूर याला म्हणाली, पांढरा उंदीर, वाचा काय घडले?
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. रिपोर्टनुसार रामायणवर आधारित चित्रपटाची निर्मिती ही बाॅलिवूडकडून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रामाच्या भूमिकेत बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा तर सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट (Alia Bhatt) ही दिसणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, यावर आलिया किंवा रणबीर कपूर यांनी काहीच भाष्य केले नाहीये. अनेकांनी आलिया आणि रणबीर कपूर हे रामायण चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळताच टीका करण्यास सुरूवात केली. दुसरीकडे या बातमीनंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद हा बघायला मिळतोय.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे रामायण चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळताच बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मोठा समाचार हा घेतलाय. कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भडास काढली आहे. कंगना राणावत हिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत असून ही पोस्ट तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहे.

कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नुकताच मी ऐकले आहे की, बाॅलिवूडमध्ये रामायणवर आधारित चित्रपट बनवला जाणार आहे. ज्यामुळे एक पांढरा उंदीर (सो-काल्ड अभिनेता) ज्याला थोडा टॅनिंग आणि विवेक हवा आहे तो इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांच्या विरोधात घाणेरडा PR करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर तो अंमली पदार्थांचे व्यसन आणि महिलांसाठी प्रसिद्ध आहे.

ज्याला स्वतःला भगवान शिव म्हणून सिद्ध करायचे आहे. त्याला आता भगवान राम बनायचे आहे. जो साऊथचा चांगला अभिनेता आहे त्याला रावणाच्या भूमिकेसाठी आॅफर देणार असल्याचे देखील ऐकले आहे. हे अशाप्रकारचे कलयुग असल्याचे देखील कंगना हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. जो व्यक्ती ड्रग्स घेतो त्याला भगवान रामची भूमिका देत आहात. पण या व्यक्तीने भगवान रामचे पात्र साकारू नये.

आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत कंगना राणावत योग्य बोलत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मात्र, रणबीर कपूर याचे चाहते कंगना राणावत हिला टार्गेट करताना दिसत आहेत. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर नेहमीच रणबीर कपूर हा असतो.