
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री कंगना रानौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त कमेंट करत वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या कंगना हिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना आणि तिच्या कुटुंबियांची चर्चा रंगली आहे. कंगना हिच्या घरात एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. कंगना हिच्या वहिनीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कंगना हिने चिमुकल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना आणि तिच्या कुटुंबातील चिमुकल्याची चर्चा रंगत आहे.
कंगना हिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेची आई आशा रानौत, बहीण रंगोली चंदेल आणि भाऊ अक्षत रानौत देखील दिसत आहे. कुटुंबियांचे चिमुकल्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने भाऊ अक्षत रानौत आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
My dear Ritu it’s been a delight to see you transform from a giggle girl to a sublime woman and now a gentle mother.
All my love and blessings for this glorious chapter of your and Aksht’s life.
Your happy family makes for a beautiful picture that makes my heart full in a way… pic.twitter.com/34Ni2l6OYc— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 20, 2023
चिमुकल्याचे फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘आज आनंदाच्या क्षणी आमच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. माझा भाऊ अक्षत रानौत आणि त्याची पत्नी रितू रानौत यांनी पूत्र प्राप्ती झाली आहे. कुटुंबातील चिमुकल्याचं नाव अश्वथामा ठेवलं आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबातील नवीन सदस्याला आशीर्वाद द्या…’ असं देखील अभिनेत्री ट्विटमध्ये म्हणाली आहे.
रानौत कुटुंबात आलेल्या नव्या पाहुण्यासोबत प्रत्येकाने फोटो काढले आहेत. चाहते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीचं अभिनंदन करत आहेत. कंगना कायम वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत.
कंगना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्गज आणि इंडस्ट्रीतील लोकप्रिय व्यक्तींवर निशाणा साधताना दिसत असते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य काही चाहत्यांना आवडतं, तर काही मात्र अभिनेत्रीचा विरोध करताना दिसतात. पण तरी देखील कंगना प्रत्येकाला सडेतोड उत्तर देताना दिसते.
सोशल मीडियावर कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कंगना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत असतात.