शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा काय होती? म्हणाली, शेवटच्या श्वासापर्यंत कांटा लगा गर्ल

Shefali Jariwala Demise: 'शेवटच्या श्वासापर्यंत मला...', स्वतः शेफाली हिने व्यक्त केली होती शेवटची इच्छा, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, निधनानंतर शेफालीने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल

शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा काय होती? म्हणाली, शेवटच्या श्वासापर्यंत कांटा लगा गर्ल
फाईल फोटो
| Updated on: Jun 28, 2025 | 12:32 PM

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाली हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी शेफाली हिने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झालं असं सांगण्यात येत आहे. परंतू तिच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. सध्या शेफाली हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेफाली हिची एक मुलाखत देखील सध्या चर्चेत आली आहे. ज्यामधेये अभिनेत्रीने स्वतःची शेवटची इच्छा सांगितली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफालीच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

मुलखतीत शेफालीला विचारण्यात आलं, ‘कांटा लगा गर्ल‘ सगळेच तुला बोलतात… याचा तुला कंटाला येक नाही? यावर आनंदाने अभिनेत्रीने उत्तर दिलं. शेफाली म्हणाली, ‘कधीच नाही… संपर्ण जगात एकच कांटा लगा गर्ल आहे आणि ती म्हणजे मी… माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील मला कांटा लगा गर्ल म्हणाले तरी मला काहीही हरकत नाही…’ असं शेफाली म्हणाली होती.

 

 

मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.

शेफाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती. पण सोशल मीडियावर कायम शेफाली सक्रिय असायची. अनेक मालिका, सिनेमे आणि शोमध्ये शेफालीने काम केलं. ‘कांटा लगा’ गाण्यामुळे अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली.

शुक्रवारी शेफालीचं निधन झालं. तिच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी, ती रुग्णालयात पोहोचताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिची आई दुःखाने बेशुद्ध पडली होती आणि पती पराग त्यागी रुग्णालयाबाहेर रडताना दिसला.

शेफाली जरीवाल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला असून तिचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. तिचा अत्यंत जिवलग मित्र आणि फिटनेस ट्रेनरही रुग्णालयात पोहोचला. तिच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की, शेफाली आरोग्याबाबत अत्यंत शिस्तबद्ध होती. ती नियमित व्यायाम करायची. ती योग्य आहाराचे पालन करीत होती आणि फिटनेस हेच तिचे प्राधान्य होते.

दोन दिवसांपूर्वीच ती माझी भेट घेतली होती. तिच्या एपिलेप्सी त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी ती थंड अन्नपदार्थ आणि पेये टाळत असे व झटका येऊ नये म्हणून ठराविक दिनक्रम पाळत असे सांगितले.