हार्ट अटॅक की… संशय बळावला… शेफालीच्या मृत्यूप्रकरणी नवऱ्यासह त्या दोघांचीही चौकशी; काय काय घडलं?
Shefali Jariwala Demise: कांटा लगा गर्लच्या घरी रात्री का गेलेले पोलीस? हार्ट अटॅक की... संशय बळावला..., रात्रीचा घटनाक्रम थक्क करणारा..., शेफाली जरीवालाच्या निधनामुळ झगमगत्या विश्वात खळबळ...

Shefali Jariwala Death: प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बिग बॉस 13 आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. शेफालीला तिचा पती पराग त्यागी आणि इतर तीन व्यक्तींनी अंधेरीतील बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आणलं होतं. रुग्णालयाच्या रिसेप्शनवरील कर्मचाऱ्याने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तपासासाठी शेफालीचं पार्थिव कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती मिळतात रात्री 1 वाजता शेफाली हिच्या घरी पोलीस आणि फॉरेंसिक टीम दाखल झाली. रिपोर्टनुसार, शेफालीच्या घरात पोलीस चौकशी करत आहेत.
View this post on Instagram
शेफालीच्या घरात तिचे कुटुंबिय उपस्थित असून पोलीस सर्वांनाची चौकशी करत आहेत. रात्री, शेफालीच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि कामवालीला चौकशीसाठी आंबोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुरुवातीच्या अहवालात शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने सांगितलं जात आहे. परंतू तिच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.
पती पराग त्यागी याचा नोंदवला जबाब
शेफालीचा पती पराग त्यागी याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. एवढंच नाही तर, ज्या परिसरात शेफाली राहत होती, त्याठिकाणी पोलिसांचं पथत तैनात करण्यात आलं आहे. शेफाली राहत असलेल्या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये फॉरेन्सिक टीम आणि पोलिस रात्रीपासून तपास करत होते. फॉरेन्सिक टीम काही दस्तवैजासहित थोड्याच वेळापूर्वी निघून गेली आहे.
शेफालीवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते… रात्रीचा घटनाक्रम सांगितला तर, रात्री 10.30 वाजेपर्यंत शेफालीची प्रकृती स्थिर होती. अभिनेत्री स्वतःच्या कुत्र्याला देखील फिरवत होती. पण घरी गेल्यानंतर अभिनेत्री अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तात्काळ अभिनेत्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत अभिनेत्रीचं निधन झालेले होतं. अशी माहिती शेफालीच्या पतीने दिलेली आहे. आतापर्यंत पाच लोकांचे जबाब पोलिसानी नोंदवले ज्यामध्ये नोकरांचाही समावेश आहे.
