Chanakya Niti : तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचंय? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
आर्य चाणक्य हे फक्त कुटनीती तज्ज्ञच नव्हते, तर ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. माणूस श्रीमंत कसा होऊ शकतो? याचा सोपा मार्ग चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितला आहे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, कुटनीती तज्ज्ञ देखील होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी पैशांसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्यामुळे एखादा माणूस गर्भ श्रीमंत असतो, मात्र तो त्यानंतर काही वर्षांमध्ये कंगाल होतो. त्याच्याकडे पैसा राहत नाही, तर काही लोक हे शुन्यातून जग निर्माण करतात, गरिबीमधून श्रीमंत होतात, तर या लोकांकडे अशा कोणत्या सवयी असतात, ज्यामुळे ते श्रीमंत होतात, याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे. आज आपण अशाच काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.
ध्येय ठेवा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनात ठरवता, तेव्हा त्या गोष्टीचं फक्त स्वप्न पाहू नका, कारण जी व्यक्ती कर्म न करता फक्त स्वप्न पहाते, अशी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होत नसते, त्यामुळे जेव्हा तुम्ही जर असं ठरवलं की मला श्रीमंत व्हायचं आहे, तेव्हा फक्त स्वप्न पाहून ती गोष्ट कधीच साध्य होणार नाही, तर त्यासाठी तुम्ही काम करायला सुरुवात करा, प्रचंड कष्ट करा आणि कष्ट करत असताना त्या कष्टाची एक निश्चित दिशा ठरवा, तुम्हाला नक्की यश मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आळस – चाणक्य म्हणतात आळस हा तुमच्या प्रगतीमधला सर्वात मोठा अडसर आहे, जे व्यक्ती आळस करतात, आजचं काम उद्यावर ढकलतात ते आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, तुम्हाला जे काम आज करायचं आहे, ते आजच करा, आळस झटकून कामाला लागा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल.
नम्र स्वभाव – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीचं बोलणं गोड असतं, अर्थात ज्याच्या तोंडात साखर असते आणि डोक्यावर बर्फ असतो, असाच व्यक्ती जगात यशस्वी होतो, त्यामुळे कोणतेही निर्णय कधीच रागाच्या भरात घेऊ नका, तुम्ही जेव्हा शांत असाल तेव्हाच असे निर्णय घ्या असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
