AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध क्रिकेटपटूकडून स्वत:च्या पोटच्या मुलाची हत्या… दुसऱ्या लग्नानंतर सनसनाटी आरोप

प्रसिद्ध क्रिकेटपटूने केलीय स्वत:च्याच पोटच्या मुलाची हत्या... तीन मुलांच्या जन्मानंतर परक्या महिलेसोबत अफेर.. दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोकडून सनसनाटी आरोप

प्रसिद्ध क्रिकेटपटूकडून स्वत:च्या पोटच्या मुलाची हत्या... दुसऱ्या लग्नानंतर सनसनाटी आरोप
Imad Wasim
| Updated on: Feb 17, 2026 | 8:46 AM
Share

क्रिकेटपटू फक्त त्यांच्या खेळामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. प्रसिद्ध क्रिकेटपटू असल्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक असतात. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही अशा बातम्या समोर येतात ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजते… आता देखील असंच काही झालं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या बायकोने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. क्रिकेटरने दुसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंत पहिल्या पत्नीवे क्रिकेटपटूवर सनसनाटी आरोप केले आहेत. एक पोस्ट करत पहिल्या पत्नीने क्रिकेटपटूने पोटच्या मुलाची हत्या केल्याचे आरोप केले आहेत. एवढंच नाही तर, क्रिकेटपटूच्या दुसऱ्या पत्नीला घर तोडणारी म्हटलं आहे.

सध्या ज्या क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नाही तर, पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाद वसीम आहे. इमाद याने दुसरं लग्न केलं आहे. तर इमाद याच्या पहिल्या पत्नीचं नाव सानिया अशफाक आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत सानिया हिने इमाद यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.

इमाद वसीम याचं दुसरं लग्न?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमाद वसीमने वकील आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नायला रझाशी दुसरे लग्न केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून इमाद याने दुसऱ्या लग्नाची माहिती दिली आणि सर्वत्र खळबळ माजली. इमाद याने दुसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने इमान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सानिया इमाद याला म्हणली – हत्यारा…

इमाद याच्या दुसऱ्या लग्नानंतर सानिया म्हणाली, ‘डिसेंबर 2023 मध्ये त्याने माझ्या बाळाचं अबोर्शन केलं.. तो माझ्या बाळाचा हत्यारा आहे आणि माझ्याकडे व्हिडीओ देखील आले… ज्यामुळे सर्व सत्य देखील समोर येईल. माझी फसवणूक झाली आहे…’, सानियाने पुढे लिहिले, इस्लामाबाद युनायटेडने पीएसएलमध्ये एका खुनी आणि फसवणूक करणाऱ्याला संधी दिली आहे. कोणत्याही फसवणूक करणाऱ्या किंवा खुनीला सोडले जाऊ नये.

पुढे सानिया म्हणाली, ‘आता प्रत्येक जण घर तोडणाऱ्या महिलेचा चेहरा समोर आला आहे. तिने असं करण्याआधी माझ्या मुलांचा देखील विचार केला नाही. पण आता खरा चेहरा समोर आला आहे. मला माझ्या मुलासाठी न्याय हवा आहे…’

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, इमाद याची पहिली पत्नी सानिया जेव्हा प्रेग्नेंट होती, तेव्हाच, नायला हिच्यासोबत क्रिकेटपटूचं अफेअर सुरु झालेलं होतं. सानिया अशरफला हे कळताच ते दोघे वेगळे झाले. इमाद वसीमने सोशल मीडियाद्वारे सानियाशी घटस्फोटाची घोषणा केली. इमादने त्याच्या पोस्टमध्ये मुलांबद्दलही लिहिलं होतं. त्याने म्हटलं होतं की, तो त्याच्या तिन्ही मुलांना वाढवण्यास तयार आहे.

इमाद हिच्या मुलांसाठी नायला हिचं वक्तव्य…

इमाद याच्यासोबत लग्न झाल्यानंतर नायला हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये नायला म्हणते, ‘जर अल्लाहने इमाद याच्या मुलांसोबत कधी भेट झाली तर, त्यांचं मोठ्या मानाने स्वागत करेल आणि त्यांचा सांभाळ पण करेल..’ असं देखील नायला म्हणाली.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान