AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंतरमंतरवर मोठा राडा, इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, तपास यंत्रणा लागली कामाला

जंतरमंतरवर मोठा राडा झाला. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणा कामाला लागली आहे.

जंतरमंतरवर मोठा राडा, इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याला मारहाण,  तपास यंत्रणा लागली कामाला
DELHI POLICE Image Credit source: tv9
| Updated on: Oct 08, 2026 | 7:44 AM
Share

दिल्लीच्या जंतरमंतरवर मागील दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आहे. पोलिसांना डिवचल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील कथित व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबलला मारहाण झाल्याचे दिसत आहे. यानंतर पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या आंदोलकांचा शोध सुरू केला आहे. जंतर-मंतरवरील विविध ठिकाणी पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना आंदोलकांच्या विरोधात FIR दाखल होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी कर्तव्यात अडथळा आणणे, कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्याचा समावेश असणार आहे. पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांना मारहाण झाल्याचा आरोप 

जंतरमंतरवर इंडिया आघाडीदरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करत होते. एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि इतर खासदार हे पोलिसांचे बेरिकेट्स ओलांडून जात होते. तर यावेळी राहुल गांधींनी बॅरिकेट्सला लागून असलेला गेट देखील उघडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

काँग्रेस खासदारांचा दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप 

पोलिसांनी लाठीचार्ज करून अनेक नेत्यांना जखमी केल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. काही खासदारांनीही पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी महिलांना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आला.यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. याआधी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आंदोलनावरून एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, इंडिया आघाडीने संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची योजना आखली होती. त्यासाठी काँग्रेसने परवानगी घेतली नव्हती, असा दावा पोलिसांचा दावा आहे. काँग्रेसने आज देखील संपूर्ण देशात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; गोव्यातील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?