Viral Video : इंद्राचा रथ की यमराजाची सवारी? बाईकवर म्हैस, मागे दुधाच्या किटल्या अन् त्यावर माणूस! VIDEO पाहून डोक्याला हात लावाल
जयपूरच्या हायवेवर एका बाईकवर म्हैस, दुधाच्या मोठ्या किटल्या आणि त्यावर बसलेला माणूस दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे अनोखं दृश्य पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडला.

बाईकवर फक्त दोन माणसांची बसण्याची जागा, त्यातल्या त्यात आपण घुसवतो म्हणा तिसरा. ते ही एकवेळ ठीक आहे. पण जर एकाच बाईक चार लोक बसलेली दिसली तर आपण डोक्याला हातच मारतो. पण जयपूरच्या हायवेवरचं दृश्य म्हणजे आश्चर्याल पण आश्चर्य वाटावं. या माणसांनी चक्क एक जीवंत म्हैस बाईकवर बसवली आहेत आणि ती बाईक वेगाने घेऊन निघालेत.
त्यासोबत बाईकला भले मोठे दुधाची किटली देखील लटवकलेली आहे. त्यातच कहर म्हणजे त्या किटली वर एक माणूस देखील बसलाय. म्हणजे बाईक चालणारा मध्ये मोठी म्हैस आणि मागे दोन किटल्या आणि त्यावर बसलेला माणूस असं ते भयानक, हास्यास्पद दृश्य. दुधाची डिलिव्हरी करताना पूर्ण मालकासकट त्याचं प्रोडक्ट घेऊन बाहेर पडलेत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ती म्हैसही काही फार त्रास देताना दिसत नाही. ती आपली गुपचूप बसली आहे जशी काय तिला रोजच बाईकवर बसून फिरायची हौस आहे.
View this post on Instagram
एका व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून कमी वेळातच प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये धुमाकूळ घातलाय. काही युजर्सनी तर या बाईकला इंद्राचा रथ म्हटलं आहे. तर कोणी याला यमराजचा आधुनिक अवतार अस देखील म्हटलं आहे. एका यूजरने चांगला टोमणाच मारलायं “तो म्हणतोय आज पाण्याशिवाय शुद्ध दूध मिळणार तर” असं म्हटलंय
खरं तर भारतीयांना जुगाड कसा करावा हे काय वेगळं सांगायला नकोय. पण या गड्यांनी तर जुगाडाची लिमीटच पार केली. त्या दुधाच्या मोठ्या किटल्या ठीक आहेत. पण त्याच्यासोबत म्हैस बाईकवर नेणं म्हणजे भारीच आत्मविश्वास हवा.
व्हिडिओ बघून हसू येत असलं तरी असा प्रवास धोकादायक आहे. एवढीशी बाईक आणि त्यावर एवढं वजन नेणे धोकादायक आहे. बाईक चालवताना म्हैस जरा जरी हलली किंवा बाईकचा तोल गेला तर भयंकर अपघात घडण्याची शक्यता आहे.
