AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्टोबर ठरणार खास ! 8 आणि 11 तारखेला ग्रहांच्या चालीत बदल, ‘या’ राशींना मिळेल लाभ

ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या हालचालींमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 8 आणि 11 ऑक्टोबरला गुरु आणि सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे काही राशींवर विशेष प्रभाव पडू शकतो. या काळात कोणत्या राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत, जाणून घेऊया.

ऑक्टोबर ठरणार खास ! 8 आणि 11 तारखेला ग्रहांच्या चालीत बदल, ‘या’ राशींना मिळेल लाभ
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 01, 2026 | 6:29 PM
Share

ऑक्टोबर महिना ज्योतिषाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार असून, विशेषतः 8 आणि 11  ऑक्टोबरला होणारे नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचे ठरणार आहे. ८ ऑक्टोबरला गुरु अश्लेषा नक्षत्रात, तर ११ ऑक्टोबरला सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. याशिवाय शुक्र वक्री होणे, सूर्याचे राशी परिवर्तन, बुध वक्री होणे आणि महिन्याच्या अखेरीस गुरुचे राशी परिवर्तन असे बदलही होणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार या ग्रहबदलांचा परिणाम करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांशी संबंधित बाबींवर होऊ शकतो.

8 ऑक्टोबरला गुरुचे नक्षत्र परिवर्तन

8 ऑक्टोबरला देवगुरु बृहस्पती अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, धन, शिक्षण, विवाह, संतती आणि भाग्याशी जोडला जातो. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागण्याची तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीला आर्थिक लाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तर कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरी किंवा कामाशी संबंधित प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

11ऑक्टोबरला सूर्याचं नक्षत्र परिवर्तन

11 ऑक्टोबरला सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. सूर्याला मान-सन्मान, आत्मविश्वास, पद आणि नोकरीशी संबंधित ग्रह मानले जाते. मेष राशीच्या व्यक्तींना कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढून कामात ओळख मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात.

ऑक्टोबरमध्ये आणखी ग्रहबदल

3  ऑक्टोबरला शुक्र वक्री, 17 ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत आणि 24 ऑक्टोबरला बुध वक्री होणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबरला गुरु कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करतील. त्यामुळे ऑक्टोबरमधील ग्रहस्थितीतील हे बदल विविध राशींवर वेगवेगळा परिणाम करू शकतात.

या राशींवर होऊ शकतो प्रभाव

मेष, वृषभ, कर्क, कन्या, सिंह आणि धनु राशींवर ऑक्टोबरमधील ग्रहस्थितीचा विशेष प्रभाव दिसू शकतो. काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना खर्च आणि गुंतवणुकीबाबत अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागू शकतात.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?