AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावरान झणझणीत गावरान मिरचीचा ठेचा; आजीच्या हातचा अस्सल गावरान मिरचीचा ठेचा असा बनवा

आजीच्या हातच्या चवीची आठवण करून देणारा हा गावरान मिरचीचा ठेचा घरी सहज बनवता येतो. गरम भाकरी, कांदा आणि भाजीसोबत हा ठेचा जेवणाची रंगतच वाढवतो.

| Updated on: Oct 07, 2026 | 8:37 PM
Share
आज्जीच्या हातचा ठेचा म्हटलं कि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात मिरचीचा ठेचा असेल तर आहाह बातच न्यारी. काय मग आली कि नाही आजीच्या हाताच्या मिरचीच्या ठेच्याची चव तोंडात. आजकाल त्या बाजारी मिरचीच्या चटण्यांना ती चव काय येणार म्हणा. चला तर मग आज्जीच्या हातची आठवण करून देणारी झणझणीत अस्सल गावरान मिरचीचा ठेचा कसा करायचा ते पाहूयात

1 / 8
साहित्य :  10 ते 12 गावरान हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा जीरे, मीठ, 1 ते 2 चमचे तेल, थोडी चिरलेली कोथिंबीर

साहित्य : 10 ते 12 गावरान हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा जीरे, मीठ, 1 ते 2 चमचे तेल, थोडी चिरलेली कोथिंबीर

2 / 8
सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून छान सुकवून घ्या.  तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल सोडा आणि त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. मंद आचेवर मिरच्या थोड्या भाजून घ्या. मिरच्यांना सालावर हलके काळसर डाग पडले आणि लसूण छान भाजली कि काढून घ्या.

3 / 8
आता त्या तव्यावर शेंगदाणे, जिरे आणि तीळ हलके भाजून घ्या. शेंगदाणे आधीच भाजलेले असतील तर फक्त थोडं गरम करा. जास्त पण भाजू नका नाहीतर चटणीला कडवट चव येईल.

आता त्या तव्यावर शेंगदाणे, जिरे आणि तीळ हलके भाजून घ्या. शेंगदाणे आधीच भाजलेले असतील तर फक्त थोडं गरम करा. जास्त पण भाजू नका नाहीतर चटणीला कडवट चव येईल.

4 / 8
मिक्सरमध्ये बारीक करण्याऐवजी खलबत्ता वापरा चव चांगली टिकेल. खलबत्यात आधी भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ घाला. मिरच्या पूर्ण गुळगुळीत वाटू नका. थोड्या जाडसर राहू द्या

मिक्सरमध्ये बारीक करण्याऐवजी खलबत्ता वापरा चव चांगली टिकेल. खलबत्यात आधी भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ घाला. मिरच्या पूर्ण गुळगुळीत वाटू नका. थोड्या जाडसर राहू द्या

5 / 8
यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि तीळ घाला, पुन्हा सगळं एकत्र ठेचून घ्या.शेंगदाणे पूर्ण पेस्ट न करता थोडे जाडसर राहिले तर ठेच्याला  छान कुरकुरीतपणा येतो.

यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि तीळ घाला, पुन्हा सगळं एकत्र ठेचून घ्या.शेंगदाणे पूर्ण पेस्ट न करता थोडे जाडसर राहिले तर ठेच्याला छान कुरकुरीतपणा येतो.

6 / 8
शेवटी त्यात थोडी बारीक चिरलेली कोंथिंबीर आणि एक चमचा तेल घाला. सगळ नीट एकत्र करून ठेचा तयार करा. ज्यांना जास्त तिखट नको त्यांनी मिरच्यांचे प्रमाण कमी करा.

शेवटी त्यात थोडी बारीक चिरलेली कोंथिंबीर आणि एक चमचा तेल घाला. सगळ नीट एकत्र करून ठेचा तयार करा. ज्यांना जास्त तिखट नको त्यांनी मिरच्यांचे प्रमाण कमी करा.

7 / 8
गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, कांदा,भाजी आणि मिरचीच्या झणझणीत ठेच्याचा आस्वाद घ्या.

गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, कांदा,भाजी आणि मिरचीच्या झणझणीत ठेच्याचा आस्वाद घ्या.

8 / 8
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...