AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरवाढीचे आंदोलन; आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या

Petrol Diesel Prices Today 8 October 2026 : जागतिक बाजारात अस्थिरता कायम आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार सुरू आहे. आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या एका क्लिकवर

Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरवाढीचे आंदोलन; आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या
आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग?
| Updated on: Oct 08, 2026 | 6:32 AM
Share

Petrol Diesel Prices Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दरवाढीचे आंदोलन सुरू आहे. इंधनाच्या किंमती अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आहेत. मध्यपूर्वेतील संघर्ष आणि हुथी बंडखोरांकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठा विस्कळीत होत आहे. आता त्यात अमेरिकेला नवीन वादळाची भर पडली आहे. मॅक्सिकोच्या आखातात चक्रीवादाळाची शक्यता वर्तवली जात आहे. या धोक्यामुळे अमेरिकेतली तेल आणि गॅस उत्पादन प्रकल्पांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ अधिक सक्रीय झाल्यास त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीत वाढ होऊ शकते. आज काय आहेत पेट्रोल आणि डिझेलची किंमत?

महागाईचा भडका

जागतिक बाजारात कच्चा तेलाचा भाव वधारला. सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यात घट येण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर दिसून येत आहे. देशांतर्गत महागाई आणि चलनवाढीवर मोठा परिणाम होत आहे. आरबीआयने महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात वाढ केली आहे. देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलची किंमत स्थिर असली तरी काल सीएनजीची किंमत पुन्हा वाढली. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरात गेल्या एका वर्षात सीएनजी महागला आहे. वाहनचालकांच्या खिशावर मोठा ताण आला आहे.

कच्चा तेलाचा भाव काय?

ब्रेंट क्रूड ऑईल: जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 101.17 डॉलरच्या जवळपास आहे.

डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल: अमेरिकन बेंचमार्क WTI Crude 88.50 डॉलरच्या घरात आहे.

महानगरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय?

goodreturns या संकेतस्थळानुसार, सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी किंमती अपडेट केल्या आहेत. त्यानुसार, देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सध्या कोणतीही तफावत आढळलेली नाही.

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

किंमती जाणून घ्या एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...