Petrol-Diesel Price: इराणच्या निर्णयाने इंधनाला आग? पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार? 1 लिटरचा भाव जाणून घ्या
Petrol Diesel Prices Today 7 October 2026 : चीन आणि इराणच्या खेळीने जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढतील का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सौदी अरब, संयुक्त अरब अमिरातमुळे मुबलक इंधन पुरवठा होत आहे. तरीही बाजारात अनिश्चितता आहे.

Petrol Diesel Prices Today : इराण आणि चीनच्या खेळीने जगावर इंधन संकट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. होर्मुझ समुद्रधुनी लवकर पुन्हा उघडली नाही तर जगाला गंभीर इंधन टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा धोक्याचा इशारा जगातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी सौदी अरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय तेलसाठ्यातील इंधन झपाट्याने कमी होत असल्याकडेही त्यांनी जगाचे लक्ष वेधले. अमेरिका आणि इराणमधील युद्धाला विराम बसल्यास जग सुटकेचा निश्वास टाकू शकते. काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव?
कच्चा तेलाची किंमत काय?
जागातिक बाजारातील कच्चा तेलाच्या आकडेवारीनुसार, अमेरिका वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट इंधनाचा (WTI Crude) दर 89.91 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. त्यात किंचित दरवाढ नोंदवली गेली. तर ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा भाव घसरला आहे. 100.32 डॉलर प्रति बॅरलवरुन किंमत 98.35 डॉलरवर आला आहे. MCX कच्चे तेल 8,624 ते 8,630 रुपये असा भाव आहे.
महानगरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव जाणून काय?
goodreturns या संकेतस्थळानुसार, सरकारी तेल कंपन्यांआधारे दरफलक जाहीर केला आहे. देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सध्या कोणतीही तफावत आढळलेली नाही.
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.
चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे
कोलकत्ता: पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.
किंमती एका SMS वर
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
