AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: सरकारी कंपन्यांनी महागाईचा गिअर टाकला? 1 लिटर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : नायरा या कंपनीने पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ केल्यानंतर सरकारी कंपन्या सुद्धा महागाईचा गिअर टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज, 6 ऑक्टोबर रोजी काय आहे पेट्रोल आणि डिझेलची किंमत?

Petrol-Diesel Price: सरकारी कंपन्यांनी महागाईचा गिअर टाकला? 1 लिटर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?
पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय
| Updated on: Oct 06, 2026 | 6:36 AM
Share

Petrol Diesel Prices Today : नायरा या कंपनीने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ केली. त्यानंतर सरकारी तेल विपणन कंपन्या सुद्धा महागाईचा गिअर टाकू शकतात अशी भीती नागरिकांमध्ये आहे. जागतिक बाजारात इंधनाचे दर हिंदोळ्यावर आहे. गेल्या आठवड्यात किंमतीत चढउतार सुरू आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात यांचा जागतिक बाजारातील पुरवठा सुरळीत झाला आहे. तेलाची आवक वाढली आहे. काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव?

जागतिक बाजारातून आनंदवार्ता

जागतिक बाजारातून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज 6 ऑक्टोबर रोजी आकडेवारीनुसार, कच्चा तेलाच्या किंमतीत प्रति बॅरलमागे 2 डॉलरची मोठी घसरण झाली. Emirates News Agency barchart या अधिकृत बाजारातील अहवालानुसार, मध्य-पूर्वेतील भागातून कच्चा तेलाच्या निर्यातीत अचानक वाढ झाल्याचा परिणाम बाजारात दिसला. आवक वाढल्याने कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसली.

कच्चा तेलाचे आजचे दर

सोमवी झालेल्या व्यवहारांनुसार, जागातिक बाजारातील कच्चा तेलाच्या आकडेवारीनुसार,

ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा भाव : 1.93 डॉलरची घसरून होऊन 100.32 डॉलर प्रति बॅरलचा भाव

अमेरिका वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (WTI Crude): 1.68 डॉलरची घसरण, हा भाव 89.43 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला.

देशातील प्रमुख महानगरातील आजचे इंधन दर काय?

goodreturns या संकेतस्थळानुसार, सरकारी तेल कंपन्यांआधारे दरफलक जाहीर केला आहे. देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सध्या कोणतीही तफावत आढळलेली नाही.

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील भाव

पुणे : पेट्रोलचा भाव 111.90 रुपये, तर डिझेलचा भाव 98.48 रुपये

नागपूर: पेट्रोलचा दर 111.15 रुपये, तर डिझेलचा दर 97.68 रुपये

छत्रपती संभाजीनगर: पेट्रोलचा भाव112.30 रुपये आणि डिझेलचा भाव 98.72 रुपये

नाशिक : पेट्रोलचा भाव 111.50 रुपये, तर डिझेलची किंमत 98.10 रुपये

किंमती एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?