AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 सवयी आयुष्याचं वाटोळं करतात, वेळीच सावध व्हा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात मणसाला अशा काही सवय असतात, ज्यामुळे त्यांच आयुष्य उद्ध्वस्त होतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या 4 सवयी आयुष्याचं वाटोळं करतात, वेळीच सावध व्हा
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 7:38 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाला अशा काही सवयी असतात, ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या सवयी हातात वेळ असतानाच बदलल्या गेल्या पाहिजेत. एकदा वेळ निघून गेली की पश्चातापाशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहतं नाही. या सवयी तुम्हाला तर त्रासदायक ठरतातच परंतु तुमच्या कुटुंबासाठी देखील त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे हातात वेळ असतानाच या सवयी बदलल्या गेल्याच पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. आज आपण या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. पाहूयात चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राग – चाणक्य म्हणतात राग ही अशी गोष्ट आहे, आयुष्यात या गोष्टीमुळे कोणाचेही कधी भले झाले नाही. रागाच्या भरात व्यक्ती आपल्या मनावरील नियंत्रण गमावून बसतो आणि त्यामुळे तो अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता आलेच पाहिजे.

पैशांची उधळपट्टी- चाणक्य म्हणतात अनेक लोकांना विनाकारण पैसा खर्च करण्याची सवय असते. ही सवय फार घातक आहे. पैशांची नेहमी बचत केली पाहिजे. समजा तुम्ही शंभर रुपये कमावत असाल तर त्यातील किमान पंचवीस रुपये हे बचत केलेच पाहिजेत. कारण हाच पैसा संकट काळात तुमच्या मदतीला येणार आहे.

आळस – चाणक्य म्हणतात माणसाच्या अंगात कधीही आळस असू नये. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त सुख तुमच्या वाट्याला येणार आहे, त्यामुळे माणसाने कधीही कोणत्या कामात आळस करू नये.

काम पुढे ढकलण्याची सवय – चाणक्य म्हणतात अनेकांना काम पुढे ढकलण्याची सवय असते, मात्र यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कधीही आजचं काम उद्यावर ढकलू नका, आजचं काम हे आजच पूर्ण करण्याची सवय असावी, असा सल्ला देखील आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं