AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकविरुद्ध वैभवची बॅट तळपेना, 11 रनमुळे निराश, अश्रू रोखले; मनाची घालमेल कॅमेरात कैद, पाहा VIDEO!

वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा त्याची बॅट शांत राहिली. अवघ्या 11 रनवर आऊट झाल्यानंतर मैदानावर नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल VIDEO.

पाकविरुद्ध वैभवची बॅट तळपेना, 11 रनमुळे निराश, अश्रू रोखले; मनाची घालमेल कॅमेरात कैद, पाहा VIDEO!
vaibhav sooryavanshi disappointed against pakistanImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 22, 2026 | 10:32 PM
Share

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, या सामन्यातही त्याची बॅट शांतच राहिली. पाकिस्तान ए विरुद्ध वैभव अवघ्या 11 धावा करून माघारी परतला. विशेष म्हणजे, बाद झाल्यानंतर वैभवच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याला आपले अश्रू रोखणंही कठीण झाल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक होते. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यातही त्याने 26 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

पाकिस्तानविरुद्धही मोठी खेळी करण्यात अपयश

वैभव सूर्यवंशीला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी लवकरच माघारी धाडलं. वेगवान गोलंदाज मोहम्मद इमरान रंधावाच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वैभवने कव्हर्सच्या वरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटवर नीट आला नाही आणि हवेत उंच गेला. पाकिस्तान एचा कर्णधार अब्दुल समदने कोणतीही चूक न करता त्याचा झेल पकडला.

वैभवने 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. अवघ्या 4 षटकांच्या आत त्याची खेळी संपुष्टात आली. त्यामुळे भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नांना सुरुवातीलाच धक्का बसला.

पाकिस्तानविरुद्ध वैभवची कामगिरी कशी राहिली?

पाकिस्तानविरुद्ध वैभवची कामगिरी याआधीही फारशी चांगली राहिलेली नाही. अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एका सामन्यात त्याने 5 धावा केल्या होत्या. तर अंतिम सामन्यात 10 चेंडूंत 26 धावा ठोकल्या होत्या. आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये मात्र त्याने पाकिस्तान ए विरुद्ध 28 चेंडूंत 45 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, या स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने वैभवच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे.  या फलंदाजाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. पुढे कधी पाकविरुद्ध खेळताना वैभवची बॅट तळपते याकडे मात्र लक्ष असणार आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!