Saudi Arabia strict law : फेसबुकच्या एका कमेंटमुळे सौदीने हिंदू तरुणाला सुनावली देहदंडाची शिक्षा, ईशनिंदेच्या खटल्यात ठरवले दोषी…
शिक्षेच्या अमलबजावणीची तारीख जाहीर केलेली नसल्याने आणि गेल्या महिन्यापासून अनोजन याचा कोणताही संपर्क न झाल्याने त्याचे कुटुंबिय प्रचंड घाबरलेले आहे.

सौदी अरब एका श्रीलंकेच्या २४ वर्षांच्या तरुणाला ईशनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर फेसबुक पोस्टद्वार पैंगबर मोहम्मद यांचा कथितपणे अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सौदी अरबच्या एका अपिलीय कोर्टाने २४ वर्षाच्या अनोझन शिवरासा याला फेसबुक कमेंटमध्ये इस्लामच्या विरोधात ईशनिंदा प्रकरणात दोषी ठरवले गेले आहे. या प्रकरणाने श्रीलंकेत खळबळ उडाली आहे.आणि या तरुणाला वाचवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे.
बीबीसीच्या एका बातमीनुसार हे प्रकरण श्रीलंकेतील एका हिंदू तिर्थयात्रा आणि जूनच्या एका व्हायरल व्हिडीओ संबंधित आहे. ज्यात एक मुस्लीम व्यक्ती तिर्थ यात्रेकरुंच्या पाठी चालणाऱ्या कुत्र्याला लाथ मारताना दाखवला आहे. या फेसबुक पोस्टमध्ये एका मुस्लीम व्यक्तीने हिंदू देवतेचा अपमान करणारी पोस्ट टाकली होती.ज्यावर त्या तरुणाने उत्तर देताना तामिळ भाषेत पोस्ट केली. या कमेंटमध्ये मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याचा तरुणावर आरोप आहे.
श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात राहणारे अनोजन शिवारासा नऊ महिन्याआधी नोकरीसाठी सौदी अरबमध्ये आला होता. संपूर्ण प्रकरण श्रीलंकेतील एका हिंदू तीर्थ यात्रेशी संबंधित व्हिडीओने सुरु झाले. या वादाचा सौदीच्या भूमीशी कोणताही संबंध नव्हता. जून महिन्यात सोशल मीडियात आलेल्या एका व्हिडीओत भाविकाच्या पाठी चालणाऱ्या कुत्र्याला लाथ मारणारा मुस्लीम तरुण दाखवण्यात आला होता.यावरुन सोशल मीडियात मोठा वाद झाला. एका युजरने हिंदू देवी-देवतांच्या आपत्तीजनक टिप्पणी केली. याच्या उत्तरार्थ अनोचन शिवरासा याने तामिळ भाषेत कमेंट करत कथितपणे पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिपण्णी केली.
कमेंट लगेच डिलिट केली आणि माफी मागतली तरी…
अनोजन याला त्याच्या चुकीचा अंदाज आल्याने त्याने वाद नको म्हणून ही कमेंट लगेच डिलिट केली आणि माफी मागणारा आपला व्हिडीओही जारी केला. त्यानंतरही ही पोस्ट पूर्णपणे डिलिट न होता सोशल मीडियात फिरतच राहिली. कोणी त्या पोस्टचा स्क्रीन शॉर्ट काढली.श्रीलंकेतील काही लोकांनी तो स्क्रीनशॉर्ट काढून सौदीतील त्या कंपनीला मेल केली, जेथे अनोचन नोकरी करत होता. त्यानंतर कंपनीने याची तक्रार सौदी अधिकाऱ्यांना केली. २ जुलै रोजी अनोचन याला अटक झाली. त्यानंतर त्याचे सर्व गॅझेट जप्त करण्यात आले. आणि सोशल मीडिया अकाऊंट रद्द केले गेले.
सुरुवातीला अनोजन याला पाच वर्षांची सजा
सौदीच्या अल-अहसा क्रिमिनल कोर्टाने सुरुवातीला अनोजन याला पाच वर्षांची सजा सुनावली आणि त्याच्यावर 30 लाख सऊदी रियालचा दंड सुनावला. परंतू गेल्या महिन्यात अचानक केसने वेगळे वळण घेतले. सरकारी वकीलांनी अनोजन याच्यावर शरिया कायद्यानुसार खटला चालवण्याची मागणी केली. अपिल कोर्टाने ही मागणी मंजूर केली. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेच्या अमलबजावणीचा कार्यकाल जाहीर केलेला नाही. 28 सप्टेंबरनंतर अनोझन याच्या कुटुंबाला त्याच्या ख्यालीखुशालीची कोणतीही बातमी आलेली नाही.
श्रीलंकन सरकार या घटनेवर नजर ठेवून आहे. मात्र, शिक्षेच्या अमलबजावणीची तारीख जाहीर केलेली नसल्याने आणि गेल्या महिन्यापासून अनोजन याचा कोणताही संपर्क न झाल्याने त्याचे कुटुंबिय प्रचंड घाबरलेले आहे. त्याची आई रासामनिकम योगलक्ष्मी यांनी माझ्या मुलाच्या चुकीबद्दल मी माफी मागत आहे. कृपया त्याला माफ करावे आणि माझ्याकडे पाठवावे अशी मागणी केली आहे.
