AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swiggy-Zomato : ऑनलाईन फूड ऑर्डर करणं होणार स्वस्त? Swiggy-Zomato च्या डिलिव्हरी चार्जवरील GST होणार कमी

Swiggy-Zomato सारख्या प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी चार्जवर आकारला जाणारा GST कमी करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. 8 ऑक्टोबरच्या GST Council बैठकीनंतर याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

Swiggy-Zomato :  ऑनलाईन फूड ऑर्डर करणं होणार स्वस्त?  Swiggy-Zomato च्या डिलिव्हरी चार्जवरील GST होणार कमी
SWIGGY ZOMATO GST CHARGESImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 5:34 PM
Share

swiggy – Zomato वरून जेवण मागवताना पदार्थापेक्षा डिलिव्हरी चार्जेस जास्त महाग वाटतात. नव्या नियमानुसार यात आता बदल होण्याची शक्यता आहे.म्हणजेच swiggy – Zomato वरून ऑनलाईन फूड ऑर्डर करणं स्वस्त होणार आहे.कारण डिलिव्हरीवर आकारला जाणार GST 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

GST Council ची बैठक 8 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत swiggy – Zomato यासारख्या प्लॅटफॉर्म वरून होणाऱ्या सेवांवरील GST कमी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के GST लागू आहे. मात्र ग्राहकांकडून डिलिव्हरी चार्जेस म्हणून एक्ट्रा 18 टक्के घेतले जातात. डिलिव्हरी चार्जेसवरील हे 18 टक्के कमी करून आता या दोन्ही सेवांसाठी एकसारखा 5 टक्के GST लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर डिलिव्हरी चार्जेस वरील कराचा दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के होईल. त्यामुळे ऑनलाईन फूड ऑर्डरच्या बिलात थोडी घट होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष बिलात किती फरक पडेल. हे संबंधित प्लॅटफॉर्मच्या आकारणीवर अवलंबून असेल. या प्रस्तावामुळे ग्राहकांनाच प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे. याशिवाय डिलिव्हरी सेवांवरील GST ची पद्धतही सोपी होऊ शकते.

याशिवाय 8 ऑक्टोबरला GST COUNCIL च्या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट आणि फिटनेस सेंटरसारख्या 5 टक्के GST भरणाऱ्या व्यवसायांना INPUT TAX CREADIT म्हणजेच ITC चा फायदा देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. तसेच काही दुर्मीळ आजारांवरील काही औषधांना GSTमधून सूट देण्याचाही विचार केला जाणार आहे. मात्र या सगळ्यावर 8 ऑक्टोबरच्या बैठकीत GST COUNCIL कडून निर्णय झाल्यानंतरच याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होईल.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?