AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : 75 लाख खर्च करून उभं केलं घर; मुलानेच हाकलून दिल्याचा आई-वडिलांचा आरोप, पण समोर आली वेगळीच बाजू

आग्र्यातील राम बिलास कटारा आणि त्यांच्या पत्नी उषा कटारा यांचा घराच्या वादाशी संबंधित VIDEO सोशल मीडियावर VIRAL झाला आहे. मात्र आग्रा पोलिसांच्या माहितीनुसार हे प्रकरण मालमत्तेच्या मालकी हक्क आणि वाटणीशी संबंधित असून न्यायालयात सुरू आहे.

Viral Video : 75 लाख खर्च करून उभं केलं घर; मुलानेच हाकलून दिल्याचा आई-वडिलांचा आरोप, पण समोर आली वेगळीच बाजू
viral videoImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 07, 2026 | 10:14 PM
Share

आयुष्यभराची कमाई लावून घरं उभं केलं, पण आज त्यात घरातून त्यांना मुलाने हाकलवून लावलं आहे.स्वत:च्या हक्काचे घर असूनही आज त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागतंय. आग्र्यातील राम बिलास कटारा आणि त्यांची पत्नी उषा कटारा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलगा आणि सुनेवर घरातून हालकलवून लावल्याचे आरोप केले आहेत.

मात्र या प्रकरणाला एक दुसरी बाजू देखील आहे. आग्रा पोलिंसांच्या माहितीनुसार हा कौटुंबिक मालमत्तेच्या मालकी हक्क आणि वाटणीचा वाद असून प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.

राम बिलास कटारा यांच्या म्हणण्यांनुसार, त्यांनी घर बांधण्यासाठी 75 लाख रूपये खर्च केले होते. त्यांचा आरोप असा आहे कि याच त्यांच्या घरातून त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाने आणि सुनेने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घरातून बाहेर काढले. त्यानंतर हे दांपत्य आता आपल्या लहान मुलासोबत राहत भाड्याने राहत आहे.

या प्रकरणाबाबत न्याय मिळावा यासाठी गेल्या काही वर्षापासून अधिकाऱ्यांकडे धाव घेत असल्याचा दावा राम बिलास यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरही यासंबंधित 10 हजार व्हिडिओ शेअर केले आहेत.व्हायरल झालेल्या या व्हिडिओत त्यांची पत्नी रडताना दिसत आहे. तर राम बिलास लोकांकडे आणि प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहे.

तसेच राम बिलास यांनी त्यांच्या सुनेवर आणि मुलावर ते घर त्यांच्या परवानगीशिवाय विकल्याचा आरोपही केला आहे.या प्रकरणात न्यायालयीन वाद सुरू असल्याने मालमत्तेचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आग्रा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या माहितीनुसार राम बिलास यांनी त्यांच्या या दत्तक मुलावर आणि सुनेवर तक्रार देखील नोंदवली आहे.

पोलिंसांनी पुढे स्पष्ट केलंय की, सध्या राम बिलास हे त्यांच्या पत्नी आणि लहान मुलासोबत भाड्याने राहत आहेत. चौकशीदरम्यान दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवण्यात आले असून परस्परविरोधी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक आणि दिवानी स्वरूपाचं असल्यांच सांगितलं आहे. म्हणून सोशल मीडियावर जरी हे दांपत्य कितीही मदतीची याचना करत असलं तरी या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रकियेतूनच होणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...