AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Pilgaonkar : तो मला म्हणाला, तूला क्रिकेट जमणार नाही, तुझं काम कर…सचिन पिळगांवकरांनी सांगितला सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचा किस्सा

Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचा किस्सा सांगितला आहे.

Sachin Pilgaonkar : तो मला म्हणाला, तूला क्रिकेट जमणार नाही, तुझं काम कर...सचिन पिळगांवकरांनी सांगितला सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचा किस्सा
| Updated on: Oct 07, 2026 | 8:11 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं असून त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे सचिन पिळगांवकर यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे मुलाखतींमध्ये ते आपले अनुभव शेअर करतात. अशातच आता एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी एका सुप्रसिद्ध क्रिकेटपटूचा किस्सा सांगितला आहे.

सचिन पिळगांवकर यांनी सांगितला किस्सा

सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘मी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होतो, तेव्हा एक माझ्याच वयाचा मुलगा माझ्या घरी आला, आम्ही खूप गप्पा मारल्या. तो म्हणाला, चल क्रिकेट खेळू. मला क्रिकेट येत नाही असं मी त्याला सांगितलं. पण, तेव्हा मी शिकवतो तुला असं तो म्हणाला. मी बॅट हातात घेतली पण मला ते काही जमलं नाही. मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला तरी मला क्रिकेट खेळता आलं नाही. शेवटी तीन ते साडेतीन महिन्यानंतर तोच मला म्हणाला की, ‘जाऊदे तूला क्रिकेट जमणार नाही, तू तुझं काम कर…’ मग मी माझा चालू ठेवला. मी अभिनेता बनलो आणि तो मुलगा संदीप पाटील बनला!’ ‘मराठी चित्रसृष्टी‘ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर बोलत होते.

दरम्यान, सचिन पिळगांवकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ते ‘कापूसकोंडा‘ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. नं ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे.

चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...