AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसात प्या गरमागरम शेवग्याचे सूप; बूस्ट होईल इम्युनिटी, पाहा बनवण्याची सोपी रेसिपी

Soup Recipe for Winter: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा शरीरातील लोहाची कमतरता भरून काढायची असेल, तर शेवगा ही एक उत्तम भाजी आहे. थंडीच्या दिवसांत शेवग्याचे गरमागरम सूप प्यायला छान लागतेच, शिवाय ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

थंडीच्या दिवसात प्या गरमागरम शेवग्याचे सूप; बूस्ट होईल इम्युनिटी, पाहा बनवण्याची सोपी रेसिपी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2026 | 12:16 PM
Share

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. या दिवसांत आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. यासाठी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास आणि शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते. हिवाळ्यात चहा-कॉफीऐवजी शेवग्याचे गरमागरम सूप प्यायल्यास शरीराला पोषण मिळण्यासोबतच थंडीच्या दिवसांत आरामदायी अनुभवही मिळतो. शेवग्याच्या शेंगांचे सूप कसे बनवायचे ते जाणून घ्या.

शेवग्याचे सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शेवग्याच्या शेंगा – २ कप

टोमॅटो – १ मध्यम आकाराचा

आले – १ इंच

पिवळी मूग डाळ – २ मोठे चमचे (३० मिनिटे भिजवलेली)

पाणी – २ कप

मीठ – चवीनुसार

फोडणीसाठी साहित्य :

तूप – दीड छोटा चमचा

जिरे – १ छोटा चमचा

काळी मिरी पावडर – अर्धा छोटा चमचा

कोथिंबीर – सजावटीसाठी

शेवग्याचे सूप बनवण्याची कृती

सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन त्यांचे लहान तुकडे करून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेले आले, ३० मिनिटे भिजवलेली मूग डाळ, चवीनुसार मीठ आणि दोन कप पाणी घाला. कुकरचे झाकण लावून साधारण तीन शिट्ट्या होईपर्यंत सर्व साहित्य व्यवस्थित शिजवून घ्या.

कुकर थंड झाल्यानंतर त्यातील शिजवलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार मिश्रण एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्या, जेणेकरून शेवग्याच्या शेंगांचे तंतू वेगळे होतील आणि सूपला छान मऊसर पोत मिळेल. गरजेनुसार सूपमध्ये थोडे पाणी घालून त्याची घट्टपणा योग्य करून घ्या.

आता एका पॅनमध्ये दीड चमचा तूप गरम करा. त्यात एक चमचा जिरे घालून ते तडतडेपर्यंत परतून घ्या. तयार फोडणी सूपमध्ये घालून चांगले मिसळा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून सूपला एक उकळी येऊ द्या. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. तुमचे सूप तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

टीप – शेवग्याच्या शेंगा शिजवल्यानंतर त्या थोड्या कोमट असतानाच हाताने त्यातील संपूर्ण गर काढून घ्या आणि तो व्यवस्थित पिळून त्याचा रस काढा. असे केल्यामुळे शेंगांमधील गराचा पुरेपूर वापर करता येतो आणि कोणताही भाग वाया जात नाही.

Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...