AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Student Agitation: दोन आंदोलकांची तब्येत खालावली… मध्यरात्री उपोषणस्थळी काय घडलं? आज MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार?

MPSC Student Protest : पुण्यातील एस एम जोशी पुलावरती गेली सात दिवसांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आंदोलन पेटले. दरम्यान काल मध्यरात्री दोन आंदोलकांची तब्येत खालावली. आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे.

MPSC Student Agitation: दोन आंदोलकांची तब्येत खालावली... मध्यरात्री उपोषणस्थळी काय घडलं? आज MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार?
एमपीएससी विद्यार्थी आंदोलन
| Updated on: Oct 08, 2026 | 7:15 AM
Share

MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरती गेली सात दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे या आंदोलनात उतरलेले आहेत. आज या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. या आंदोलनाला देशभरातील विविध पक्षाचे नेते भेट देत आहेत. राज्यातील विविध पक्षाच्या आमदारांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आंदोलनातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर सत्ताधारी खासदारांनीही आंदोलनाला भेट दिली आहे. हे आंदोलन हायजॅक झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून आंदोलक ठाम आहेत. हायकोर्टानेही या आंदोलनावरून कान टोचले आहेत. रस्ता आडवू नका असे हायकोर्टाने फटकारले आहे. तर काल रात्री उपोषणकर्त्या दोन विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे.

दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आणि आमदार रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे. राज्य सरकार मधील मंत्री आज दुपारी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थळी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री उपोषणाला बसलेल्या दोन आंदोलकांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा निघतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यावरून नाराजी

मी आज तुमच्या सगळ्यांच्या समर्थनार्थ आले आहे. कोल्हापूरच्या सुपुत्र याचा आवाज घराघरांत गाजतोय. हा लढा विद्यार्थ्यांचा आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील विवेकानंद बोलीतुन धोबी पछाड करतोय. तुम्ही महाराष्ट्रातील भविष्य आहात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. तुमचा संघर्ष वाया जाणार नाही. २०१७ मध्ये मी पाण्यासाठी उपोषण केले होते. ४ दिवसांचे अहिल्यानगर मध्ये उपोषण केले होते, असे अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या. माझा चित्रपट एफस्टिन फाईल येतोय. त्यासाठी संघर्ष करावा लागला. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे असं म्हटल्यावर दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला.

आंदोलकांवर कुणाची मालकी नाही

रोहित पवार बसलेल्या ठिकाणी आंदोलनाला मी भेट देणार म्हणजे देणार आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही. विद्यार्थ्यांसाठी कालही झगडणारा वकील म्हणून त्यांना मी माहिती आहे. रोहित पवार यांचं राजकारणासाठी विद्यार्थ्यांना वापरणारे अफेअर आहे. रोहित पवार बसलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मी भेट देणार ते विद्यार्थी माझे आहेत त्यांच्यावर कुणाची मालकी नाही. एकाही विद्यार्थ्यांनी मला शिवागाळ केली नाही. विद्यार्थी मला म्हणतायेत आमच्या बाजूने बोला, असे सदावर्ते म्हणाले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...