Maharashtra News LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दाैऱ्यावर..
Maharashtra News Live : राज्यात घडामोडींना वेग आला. त्यातच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
उत्तर पुणे जिल्ह्यातील भाद्रपदि बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट
शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा-राजाची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र यंदा भाद्रपदि बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपली आहेत. त्याचा थेट परिणाम बैलपोळ्याच्या बाजारावरही पाहायला मिळतोय. पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील बाजारपेठेत दुकाने सजली आहेत, मात्र ग्राहकांची वर्दळच नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
-
आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत आता ‘परफॉर्मन्स’ महत्त्वाचा
जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेसाठी गुणवत्ताधारित मूल्यांकनाचा मोठा निर्णय. मागील ३ वर्षांच्या कामगिरीचे १०० गुणांमध्ये मूल्यमापन. दरवर्षी ३१ मार्चअखेर अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा. ७१ ते १०० गुण मिळवणारे अधिकारी ‘अ-उत्कृष्ट’ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुणवत्ताधारित पदस्थापनेत प्राधान्य
-
-
विवेकानंद पाटीलला मी घर बांधून देणारच
त्याच्या साठी नाही निदान त्याच्या आई वडिलांसाठी. तो प्रसिद्ध झाला म्हणून हे मी करत नाही त्याच घर पाहून मी भावनिक झालो. माझे वडील पण अशाच घरात राहायचे वडील सांगायचे आठवड्यातून एक दिवस घरी अंड खायला भेटायचं. मी भावनिकतेतून म्हटल की घर बांधून देतो. एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जावं अशी आमची मागणी आहे
-
देवरुखजवळ बिबट्याची दहशत; पहाटे घरासमोर CCTVमध्ये कैद
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शहरालगत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. साडवली-सह्याद्री नगर परिसरात पहाटे घरासमोर बिबट्या फिरताना CCTVमध्ये कैद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-
नागपूर भाजपा कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न
युवक कॉंग्रेस नेते अक्षय हाते यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलीसांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. आज आणि उद्याही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा आहेत. पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत…त्यानिमित दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोहित पवार एमपीएससी आंदोलन एमपीएससी विद्यार्थी यांचा आंदोलनाचा सातवा दिवस… रोहित पवार एमपीएसी विद्यार्थ्यांसोबत पुण्यात आंदोलन करत आहेत. रोहित पवार विद्यार्थ्यांसोबत रात्रभर रस्त्यावर झोपले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सेवापर्व वर्षाच्या निमित्ताने शेतकरी महिलांना शिलाई मशीन तसेच विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किट वाटप केल्या जाणार आहेत.
Published On - Oct 07,2026 8:14 AM
