AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर

Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर

| Updated on: Oct 08, 2026 | 7:58 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे, साधे राहणीमान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर हे तळागाळाशी जोडलेले व्यक्तिमत्त्व होते.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्रातील मुरुड-जंजिरा येथे झाला होता. आपल्या अभिनयाच्या एका वेगळ्या शैलीमुळे आणि रोखठोक स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या अभिनयातून कलाविश्वावर एक वेगळीच छाप उमटवली होती. अत्यंत साधे राहणीमान, तळागाळाशी जोडलेला अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

सामाजिक कार्यक्रमांमध्ये आणि चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या घरी अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असे. वयाच्या 75 व्या वर्षीही त्यांची फिटनेस चर्चेचा विषय होती. काही दिवसांपूर्वी जिममध्ये व्यायाम करतानाचा त्यांचा एक व्हिडिओही समोर आला होता. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Published on: Oct 08, 2026 07:42 AM

Follow Us