AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार, महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकरीसाठी…पुण्यातील आंदोलनात राज ठाकरेंचे विधान!

आज माझ्या मराठवाड्यातील अनेकजण पुण्यात शिकायला आलेली आहेत. रोज अभ्यास करत आहेत. पण नशिबी पेपर फुटला एवढंच येतं. तुमचा हा राज असाच कायम असणं गरजेचं आहे. मी कडवट बोलतो पण सत्य बोलतो, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे कोणाचेही पाय धरायला तयार, महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकरीसाठी...पुण्यातील आंदोलनात राज ठाकरेंचे विधान!
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 05, 2026 | 8:33 PM
Share

सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ कसा जातो हे माझ्यापेक्षा चांगलं कोणीच सांगू शकत नाही. जसे तुमच्या आयुष्यातील वर्ष निघून जातात तसे आमच्याही राजकीय नेत्यांच्या आयुष्यातील दिवस जातात. आमच्याकडे प्रत्येक वेळेला आयुष्यातील पाच वर्षे निघून जातात. मी अनेक वर्षे सांगत आलो की जातीपातीच्या राजकारणात पडू नका. जातीय राजकारणात तुम्हाला अडवलं जातं. यातच तुमचा वेळ गेला तर आई-वडिलांना काय तोंड दाखवणार. आम्ही जाती-पातीमध्ये पडलो आहोत. आपण हिंदू-मुसलमान यात पडलो आहोत. यातून अगोदर बाहेर या, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज एमपीएससी आंदोलकांची पुण्यात येऊन भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

आज माझ्या मराठवाड्यातील अनेकजण पुण्यात शिकायला आलेली आहेत. रोज अभ्यास करत आहेत. पण नशिबी पेपर फुटला एवढंच येतं. तुमचा हा राज असाच कायम असणं गरजेचं आहे. मी कडवट बोलतो पण सत्य बोलतो. अनेक लोकांना माझं बोलणं त्या वेळेला झेपत नाही. पण कालांतराने समजतं की मी सत्य बोलतोय 70 हजार तरुणांची पदभरती व्हावी अशी मागणी केली जातेय. पण हे होणार नाही. लक्षात ठेवा. दुसरंं सरकार आलं तरीही ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही. परीस्थिती समजून घ्या. वस्तुस्थिती समजून घ्या. पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. मी 22 वर्षांपासून सतत सांगतोय की महाराष्ट्रातील नोकऱ्या या महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच मिळाल्या पाहिजेत. हे जर झालं तर अशा आंदोलनांची गरजच नाही, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपण आरक्षण मागतो. पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे. जे मिळेल ते खासगी होत चाललंय. त्यासाठीच केंद्र सरकार बसलं आहे. विमानतळ, पोर्ट दिसलं की दे अडाणीला असं चालूय. सगळं खासगी होत चाललंय. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. निवडणुका येतात तेव्हा जेवणावळी दिल्या जातात. दारू दिली जाते. निवडणुकीच्या वेळी पैसे फेकले की ते आपल्याला निवडून देणार हे नेत्यांना माहिती आहे. अशा नेत्यांचा हा गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने