AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटा सन्समध्ये नवा वाद? नोएल टाटांची बोर्ड बैठकीच्या ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी! श्रीनिवासन आणि चंद्रांच्या पुनर्नियुक्तीवरही प्रश्न

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी टाटा सन्सकडे १७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे आणि एनआरसी बैठकीचे रेकॉर्डिंग मागितले आहे. त्यांनी वेणू श्रीनिवासन यांची भूमिका आणि एन. चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टाटा सन्समध्ये नवा वाद? नोएल टाटांची बोर्ड बैठकीच्या ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी! श्रीनिवासन आणि चंद्रांच्या पुनर्नियुक्तीवरही प्रश्न
Noel Tata Seeks Board Meeting Recordings
| Updated on: Nov 22, 2026 | 8:43 AM
Share

टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स सध्या समोर येत आहेत. अलीकडेच त्यांची एक बैठक झाली. या बैठकीत पाच प्रोजेक्ट्सला मंजुरी देण्यात आली. आता अजून एक वाद समोर आला आहे. टाटा समूहातील नेतृत्व आणि संचालक मंडळाशी संबंधित वादांच्या पार्श्वभूमीवर, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी पुन्हा एकदा टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकींचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, २० नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे, तसेच संचालक मंडळाच्या ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’च्या (NRC) बैठकीचे रेकॉर्डिंग मिळण्याची मागणी केली आहे.

नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग अलीकडेच पार पडली. या मिटिंगमध्ये वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग हे देखील उपस्थित होते. या मिटिंगमध्ये सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जवळपास पाच प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा या बैठकीत झालेले. पण विशेष म्हणजे, टाटा समूहातील इतर ज्या विषयांची सध्या चर्चा सुरू आहे, त्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.

केली रेकॉर्डिंग्जची मागणी

सूत्रांनुसार, नोएल टाटा यांनी टाटा सन्सचे कंपनी सचिव सुप्रकाश मुखोपाध्याय यांना एक पत्र लिहले आहे. त्या पत्रात, संचालक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांना या बैठकांच्या रेकॉर्डिंग्जची मागणी करण्याचा अधिकार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टाटा सन्सने त्यांना हे देण्यास नकार दिला होता.

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीबाबतचा नेमका वाद काय?

हा वाद ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीशी संबंधित आहे. सूत्रांनुसार, ३ सप्टेंबर रोजी ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ची (NRC) एक बैठक झाली होती. या बैठकीत, अध्यक्षपदाच्या पुढील कार्यकाळासाठी एन. चंद्रशेखरन यांनी शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयनावर त्यांना पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले.

आपल्या पत्रात नोएल टाटा यांनी वेणू श्रीनिवासन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, टाटा सन्सच्या बोर्डावर टाटा ट्रस्टचे नामनिर्देशित संचालक असलेल्या श्रीनिवासन यांनी, चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीबाबतच्या चर्चेतून स्वतःला दूर ठेवायला हवे होते. कारण यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होत होता.

वेणू श्रीनिवासन यांच्यावर प्रश्न का उपस्थित करण्यात आला?

सूत्रांच्या माहितीनुसार, नोएल टाटा यांच्या पत्रात श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील कंपनी आणि चंद्रशेखरन यांच्या मुलाच्या मालकीच्या कंपनीमधील व्यावसायिक व्यवहारांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, चंद्रशेखरन यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या हॅन्नो वेअरहाऊसिंग आणि टीव्हीएस समूह यांच्यात व्यावसायिक संबंध आहेत. याच पार्श्वभूमीवर नोएल टाटा यांनी हितसंबंधांच्या संघर्षाचा (Conflict of Interest) मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, टाटा सन्सने यापूर्वी या प्रकरणात कोणताही हितसंबंधांचा संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले होते. संबंधित व्यवहारांची आणि माहितीची नियमानुसार माहिती देण्यात आली होती, असे कंपनीचे म्हणणे आहे.

बैठकींच्या रेकॉर्डिंगची मागणी करण्यामागचे महत्त्व काय?

17 सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्ड बैठकीचे तसेच नामांकन आणि मानधन समितीच्या (NRC) बैठकीचे रेकॉर्डिंग मागवणे हे या वादातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या रेकॉर्डिंगमधून बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीबाबत कोणती भूमिका मांडण्यात आली आणि संबंधित बोर्ड सदस्यांची भूमिका काय होती, याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकते.

मात्र, नोएल टाटा यांनी केलेल्या या नव्या मागणीवर टाटा सन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...