AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : स्वस्तात संपूर्ण फॅमिलीला आता एकाच पॅकमध्ये करता येणार रिचार्ज ; नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन आणि बरंच काही

JioPostPaid Family Planमध्ये कुटुंबातील अनेक नंबर एकाच प्लॅनमध्ये जोडता येणार आहे. डेटा शेअरिंग, कॉलिंग आणि इतर फायदे कुटुंबातील सदस्यांसोबत वापरता येणार आहे. याशिवाय OTT आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन चा फायदा देखील घेता येणार आहे.

Jio : स्वस्तात संपूर्ण फॅमिलीला आता एकाच पॅकमध्ये करता येणार रिचार्ज ; नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन आणि बरंच काही
jio recharge Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 07, 2026 | 3:17 PM
Share

नवऱ्याच्या रिचार्जचा खर्च वेगळा, बायकोच्या रिचार्जचा खर्च वेगळा, त्यात पुन्हा मुलांच्या मोबाईलसाठी वेगळ रिचार्ज… असं करत करत महिन्याच्या शेवटी रिचार्जचाच खर्च जास्त वाढतो. पण jio ने असा एक प्लॅन आणलाय ज्यामुळे कमी खर्चाच सगळ्यांचा रिचार्ज एकत्र करण शक्य आहे. त्यामुळे आता प्रत्येकवेळी प्रत्येकाची रिचार्ज डेट लक्षात ठेवत रिचार्ज मारण्याची गरज लागणार नाही. jio च्या Family Postpaid Plans मध्ये एकाच बिलावर कुटुंबातील अनेक नंबर जोडता येणं शक्य होणार आहे. यासोबतच अनलिमिटेड डेटा, कॉलिंग, OTT चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

काय आहे Jio चा 499 चा फॅमिली पॅक पोस्टपेड रिचार्ज?

499 रूपयांच्या फॅमिली रिचार्ज प्लॅनमध्ये एका मेन नंबर सोबत 3 नंबर जोडता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच एकाच रिचार्जवर 4 फॅमिली मेंबर या रिचार्जचा फायदा घेऊ शकतात.पण जर एखादा सदस्य आधीपासून प्रीपेड प्लॅन वापरत असेल तर त्याचा नंबर या प्लॅनमध्ये जोडण्यापूर्वी बदलावा लागणार आहे.

या 499 च्या फॅमिली पॅक रिचार्जमध्ये टोटल 75GB डेटा मिळणार आहे. त्यासोबत प्रत्येक नवीन जोडलेल्या नंबरसाठी 5GB अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. तसंच दिलेला डेटा जर संपला किंवा तुम्ही जास्त वापरलात तर त्यासाठी एक्स्ट्रा डेटासाठी 10 रूपये प्रति GB पैसै भरावे लागणार आहेत.

याशिवाय या प्लॅनमध्ये Jio Tv, Jio Cinema, Jio cloud सारख्या सेवांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे फॅमिली हा रिचार्ज खूप फायद्याचा ठरणारा आहे.

आणखी एक 749 चा फॅमिली प्लॅन

या रिचार्जमध्ये देखील आधीासारखेच प्लॅन आहेत. पण यात तुम्हाला एक्स्ट्रा फॅसिलिटिझ मिळतात. आधीच्या रिचार्जपेक्षा यात तुम्हाला एक्सट्रा डेटा देखील मिळतो. या प्लॅनमधेही 3 नंबर तुम्हाला जोडता येतात. या प्लॅनमध्ये 100GB डेटा दिला जातो. प्रत्येक नंबरसाठी 5GB एक्स्ट्रा मिळतो. तसेच डेटा मर्यादा संपल्यानंतर 10 रूपये जास्तीचे भरावे लागतात.

आधीच्या पॅकपेक्षा या पॅकमध्ये तुम्हाला आणखी जास्त सबस्क्रिप्शन मिळतात. नेटफ्लिक्स बेसिक आणि अॅमेझॉन प्राईम लाईटची मेंबरशिप मिळत . याशिवाय Jio Hotstar, jio cinema, jio tv चे सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.

Jio यूजर्सना गुगल एआय चा प्रोचाही फायदा मिळणार

Jio आणि गुगलच्या पार्टनरशिपमुळे Jio ग्राहकांना गुगलa Ai प्रो 18 महिने फ्रीमध्ये वापरता येणार आहे. यासोबतच gemini 2.5 pro फोटो, व्हिडिओ तयार करण्यासाची सुविधा मिळणार आहे. तशाच आणखी बऱ्याच सुविधा मिळवता येणार आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...