AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या थैलीतून ऑनलाइन सामान येतं, ती आतून काळी का असते? खरं कारण ऐकून व्हाल हैराण

ऑनलाइन शॉपिंगच्या डिलिव्हरी बॅग्स आतून काळ्या का असतात? यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत. गोपनीयतेसाठी आतील काळा रंग वस्तू दिसायला देत नाही. तसेच, सूर्यप्रकाशापासून औषधे, सौंदर्यप्रसाधने सुरक्षित ठेवतो.

ज्या थैलीतून ऑनलाइन सामान येतं, ती आतून काळी का असते? खरं कारण ऐकून व्हाल हैराण
polybag black Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 11:41 PM
Share

ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ आता घराघरात पोहोचली आहे. प्रत्येकजण आता उठसूट ऑनलाइन खरेदी करत आहे. पुस्तकांपासून कपड्यांपर्यंत आणि खाण्याच्या वस्तूंपर्यंत सर्व काही ऑनलाइन मागवलं जात आहे. एका कॉर्टुनमध्ये हे ऑनलाइन सामान पॅक करून येतं. किंवा एका खास प्लास्टिकच्या बॅगेत हे सामान येतं. काही प्लॅटफॉर्म्सनी ब्राऊन रंगाच्या बॅगेतही सामान पाठवायला सुरुवात केली आहे. पण बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सफेद रंगाच्या प्लास्टिक बॅगेत सामान मिळते. ज्या सफेद बॅगेतून सामान येतं त्या आतून काळ्या असतात हे तुम्ही कधी पाहिलं का? या काळ्या रंगाच्या मागचं रहस्य काय आहे?

पांढऱ्या बॅगेच्या आतील काळ्या रंगाचं रहस्य जाणून घेण्यापूर्वी या बॅगेची कहाणी जाणून घ्या. ऑनलाइन कुरिअर करण्यात येणाऱ्या या पॅकेट्सला कुरिअर बॅग किंवा पॉलिमेलर्स म्हटलं जातं. तांत्रिक भाषेत या बॅगेला को-एक्सट्रूडेड पॉलिथीन बॅग म्हटलं जातं. इतर सामान्य पिशव्यांपेक्षा या बॅगेची प्लास्टिक क्वॉलिटी वेगळी असते. हात लावल्याबरोबर ती समजून येते. क्वालिटीमध्ये नॉर्मल प्लास्टिक बॅग चांगल्या असतात. आता या काळ्या रंगांचं गूढ समजून घेऊ.

या प्लास्टिक बॅगेत काळा रंग असण्याची अनेक कारणं आहेत. प्रायव्हेसीच्या कारणास्तवही हा काळा रंग असतो. काळ्या रंगामुळे ही थैली अपारदर्शी होते. म्हणजे आतलं काही दिसत नाही. त्यामुळे तुम्ही काय मागवलं त्याची गोपनीयता राहते.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सनलाइट प्रोटेक्शन. काही वस्तू जशा की औषधे, कॉस्मेटिक्स वा खास केमिकल्स आदी प्रखर उजेड वा उन्हात खराब होऊ शकतात. आतील काळ्या रंगामुळे सूर्य किरणे ब्लॉक केली जातात. त्यामुळे आतील सामान सुरक्षित राहते.

सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी काही खास दूध पॉकेट आतून काळ्या रंगाचे असतात. ज्या दूधाच्या पिशव्या आतून काळ्या असतात त्यातील दूध दीर्घकाळ टिकतं. खराब होत नाही. या बॅग प्लास्टिकच्या लेअरने बनवलेल्या असतात. आतील काळी लेअर अधिक मजबूत बनवली जाते. त्यामुळे त्या रस्त्यात फाटत नाहीत.

रिसाइकल हेही एक कारण

एक पॉलिबॅग बनवण्यासाठी LDPE/LLDPE सारख्या प्लास्टिक सोबत अनेकवेळा रिसाइकिल्ड प्लास्टिक मिसळलं जातं. वेगवेगळ्या रंगात जुने प्लास्टिक मिसळल्याने रंग एक सारखा आणि आकर्षक बनवणे कठिण होतं. त्यामुळे काळा रंग सोपा पर्याय आहे. त्यामुळे रिसायकलिंगमध्ये येणाऱ्या प्लास्टिकवर आधीचा रंग, प्रिंट वा हलके डाग येऊ शकतात. काळा रंग हे डाग सहज झाकोळून टाकतो.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...