AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal: शरद पवार NDA मध्ये जाणार? छगन भुजबळ यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, दिले असे उत्तर…

Chhagan Bhujbal on Sharad Pawar: राष्ट्रवादीचे विलिनीकरण असो वा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी सहभागी होणे असो यावरून सध्या मोठी राजकीय खलबतं सुरू आहेत. दावे-प्रतिदावे सुरू आहेत. याविषयीवर मंत्री छगन भुजबळ यांनी असे उत्तर दिले आहे.

Chhagan Bhujbal: शरद पवार NDA मध्ये जाणार? छगन भुजबळ यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, दिले असे उत्तर...
शरद पवार NDA मध्ये जाणार? छगन भुजबळ यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, दिले असे उत्तर...
| Updated on: Nov 24, 2026 | 1:36 PM
Share

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होतील का? यासह राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार खलबतं सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून या दोन्ही मुद्यांवर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दावे-प्रतिदिवे सुरू आहेत. याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठे भाष्य केले आहे. त्यांनी याविषयावर थेट भूमिका मांडली आहे.

शरद पवार राष्ट्रवादीसोबत जातील?

दोन्ही राष्ट्रवादीचे रवंथ गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही या मुद्दावर जोरदार चर्चा रंगल्या. त्यावर बोलताना या चर्चा वारंवार मीडियातून समोर येत असल्याचे भुजबळ म्हणाले. पण मला स्वतःला तसे वाटत नाही, असे स्पष्ट मत भुजबळांनी मांडले. तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत, NDA जातील का? याप्रश्नावर ते एनडीएत जाणार नाहीत, असे मोठे वक्तव्य भुजबळ यांनी केले आणि अनेक अटकळींवर पडदा टाकला. एखाद्या विषयाला योग्य वाटलं तर मदत करू शकतात, असे सुतोवाच करून भुजबळांनी आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदान पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळू शकतो, असे मोठे संकेत दिले. निर्णय घेत नाही तोपर्यंत फक्त चर्चा सुरू असतात. डिलिमिटेशनचा विषय योग्य असेल तर ते मदत करतील, असे सांगायला भुजबळ विसरले नाहीत. तर शरद पवार यांच्या निवृत्तीवर त्यांनी तुम्हाला वाटत असेल तर त्यांना कळवा, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.

समता पुरस्कार सोहळा पुण्यात

२८ नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्ताने फुले वाड्यात सभा होते. यामध्ये सामाजिक काम करणारे लोकं असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समता पुरस्कार दिला जातो. शरद यादव, केतकर, पवार साहेबांना दिला आहे. लेखक आणि कवी नावाजलेले जावेद अख्तर यांना देणार आहेत. कार्यक्रमाला ते येणार आहेत, असे पवार म्हणाले.

दुष्काळी तालुक्यात वाढ होत आहे. नाशिकच्या काही तालुक्यांची अतिशय वाईट स्थिती आहे. नाशिकहून काही प्रस्ताव पाठवले आहे. दुष्काळाचा भाग वाढत चालला आहे. प्यायचे पाणी राखून ठेवावे लागेल. अन्य धान्य हा दुसरा विषय ते कुठूनही आणू दुष्काळी तालुक्यातील गरिबांना अन्नधान्य मोफत देणार आहेत. केसरी कार्ड आहे त्यांनाही मोफत धान्य देणार आहे. तो उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत जाहीर करतील. जनावरे पाणी आणि चारा हा तिसरा मुद्दा आहे. जनावरे वाचली पाहिजे, दुष्काळ समिती त्याबद्दल निर्णय घेईल. वन विभागाच्या जमिनीवर चारा निर्माण करावा. चारा सरकार खरेदी करणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्रातील कामे करावी. पाण्याची पातळी खाली गेली आहे. आदेश निघाले आहेत जास्तीतजास्त कामे करावी. पाणी आडविण्याचे काम करावे, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.

Follow Us
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल