बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असूनही करण जोहर हाय-प्रोफाइल लग्नातही कधीच जेवत नाही, सांगितलं विचित्र कारण

बॉलिवूडचा लोकप्रिय अन् प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील नेहमीच चर्चेत असतो. तो अनेकदा स्वत:च्या गोष्टींबद्दल, स्वत:च्या सवयींबद्दलही स्पष्टपणे बोलताना दिसतो. एका पोडकास्टमध्ये तो त्याच्या अशाच एका विचित्र सवयींबद्दल बोलताना दिसला. करण कितीही हाय-प्रोफाइल लग्नात गेला तरी तो तिथे कधीच जेवत नाही. तो उपाशीच घरी येतो. त्याच्या सवयीमागचं कारणही त्याने सांगितलं आहे. जे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल.

बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असूनही करण जोहर हाय-प्रोफाइल लग्नातही कधीच जेवत नाही, सांगितलं विचित्र कारण
Karan Johar Strange Wedding Habit, Why Bollywood Top Director Never Eats
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 16, 2025 | 12:59 PM

बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असण्यासोबतच करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठी तसेच त्याच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखला जातो. तो अनेकदा अशा गोष्टी उघड करतो ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते. तसेच करण जोहर स्वत:बद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा करत असतो.मग ते त्याच्या चित्रपटातील कास्टींग असो, त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास असो किंवा मग त्याचे बालपण. सगळ्याच गोष्टींबद्दल तो स्पष्टपणे बोलताना दिसतो. एका मुलाखतीत त्याने त्याच्या अशाच एका विचित्र सवयीबद्दल सांगितलं आहे.

करण जोहर लग्नात जेवण का खात नाही?

नुकत्याच एका झालेल्या मुलाखतीमध्ये तो त्याच्या सवयींबद्दल बोलताना दिसला. त्याने त्याच्या एका विचत्र सवयीबद्दल सांगितलं ती म्हणजे तो कितीही हाय-प्रोफाइल लग्नांना गेला तरी देखील तो तिथे जेवत नाही. या मागे त्याने काही कारणही सांगितली आहेत. तो दरवर्षी अनेक हाय-प्रोफाइल लग्नांना उपस्थित राहतो. अलिकडेच, तो प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन अब्जाधीश राम राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना हिच्या लग्नालाही उपस्थित राहिला होता. तो अनेक प्रमुख बॉलीवूड सेलिब्रिटींच्या लग्नातही उपस्थित पाहिली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तो कितीही हाय-प्रोफाइल लग्नाला गेला तरी तो कधीही जेवत नाही. करण जोहर अनेकदा लग्नातून उपाशी परततो, त्याने स्वत:च हा खुलासा केला आहे.

‘असं प्लेट घेऊन उभे राहणे खूप विचित्र वाटतं….’

एका पॉडकास्ट दरम्यान करणने त्याच्या या सवयीबद्दल सांगितले. एका संभाषणादरम्यान लग्नातील जेवणावरून जेव्हा विषय निघाला तेव्हा करण जोहरने खुलासा केला की तो लग्नात कधीही जेवत नाही. एखाद्याच्या लग्नात जेवण्याचा विचारही त्याला अस्वस्थ करतो. लग्नात जेवायला न जाण्याच्या त्याच्या सवयीबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला, “मी कधीही कोणत्या लग्नात जेवलेलो नाही. लग्नात जेवण्यासाठी लोकांच्या लांब रांगा असतात आणि रांगेत उभे राहणे हे एक वेदनादायक काम आहे… मला हातात असं प्लेट घेऊन उभे राहणे खूप विचित्र वाटतं. असं जेवायला अस्वस्थ वाटतं. म्हणूनच मी लग्नात कधीही जेवत नाही.” करण जोहरने केलेल्या या खुलाशामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.


करण जोहरने नेत्रा मंटेनाच्या लग्नाचे आयोजन केले होते.

करण जोहरने नुकतेच उदयपूर येथे झालेल्या भारतीय-अमेरिकन अब्जाधीश राम राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेनाच्या लग्नात होस्ट म्हणून जबाबदारी घेतली होती. लग्नात अनेक प्रमुख सेलिब्रिटी उपस्थित होते. रणवीर सिंग, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित आणि वरुण धवन सारख्या सेलिब्रिटींनी लग्नात सादरीकरण केले. जेनिफर लोपेजनेही या भव्य लग्नात सादरीकरण केले. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर करण जोहरचा आणखी एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेची भूमिका असणारा तो चित्रपट म्हणजे “तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी”. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.