Karan Johar : दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टवर करण जोहरनं सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला…

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि रवि किशन 'कॉफी विथ करण ९' या टॉक शोच्या पुढील भागात दिसणार आहे. याच एपिसोडमध्ये करणने अक्षय कुमारचे कौतुक केले असून दीपिका पदुकोणच्या आठ तासांच्या शिफ्ट बाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे.

Karan Johar :  दीपिकाच्या 8  तासांच्या शिफ्टवर करण जोहरनं सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला...
karan johar and deepika padukon
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 24, 2026 | 7:27 PM

प्रसिद्ध चित्रपट निर्माता सध्या कॉफी विथ करण 9 या त्याच्या टॉक शोमुळे चर्चेत आहे. दरवेळी तो कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटींना बोलावतो. त्यांची पोलखोल करतो. त्यांच्या मनातलं सगळंच त्यांच्या ओठांवर आणतो. मज्जा, मस्ती धम्मालने त्याचा प्रत्येक एपिसोड भरलेला असतो. करणने नुकताच या शोचा एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि रवि किशन ‘कॉफी विथ करण ९’ या टॉक शोच्या पुढील भागात दिसणार आहे. याच एपिसोडमध्ये करणने अक्षय कुमारचे कौतुक केले असून दीपिका पदुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

करण जोहर अक्षय कुमारचा चाहता आहे

करण जोहरने अक्षय कुमारची प्रशंसा केली. तो म्हणाला, “जेव्हा मी अक्षयसोबत माझ्या पहिल्या चित्रपटावर काम करत होतो, तेव्हा मी ऐकायचो, ‘अक्षय हे करतो, तो ते करतो.’ खरं सांगायचं तर, मी त्याच्याइतकी मेहनत करणारा दुसरा कोणीही पाहिलेला नाही. तो पहाटे ५ वाजता मीटिंग घेतो आणि स्क्रिप्ट पाठ करतो. तो नेहमीच चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा देतो. तो एकमेव असा अभिनेता आहे जो नवीन दिग्दर्शकांना संधी देतो, पण त्याला त्याच्या योग्यतेचे श्रेय कधीच मिळाले नाही.” असे करण म्हणाला.

Loading...

दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीलाही दिला पाठिंबा

‘स्क्रीन’मधील एका वृत्तानुसार, करण जोहरने दीपिका पदुकोणची प्रशंसाही केली आहे. त्याने तिच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचे समर्थन केले. करण म्हणाला, “याच कारणामुळे मी दीपिका पदुकोणसारख्या लोकांच्या निर्णयांचा आदर करतो. जेव्हा ती अशा प्रकारे बोलते, तेव्हा या गोष्टीला इतके अवास्तव महत्त्व का दिले जाते हे मला कळत नाही. हा तिचा हक्क आहे, जो तिने स्वतःच्या हिमतीवर मिळवला आहे. ती एक स्त्री, एक पत्नी, एक आई आणि एक व्यावसायिक आहे. ती स्वतःसाठी अशा मागण्या का करू शकत नाही? अशा प्रकारचा लैंगिक भेदभाव योग्य नाही.” असे करणने म्हटले आहे. दीपिका पदुकोणने २०२५ मध्ये आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, याच मागणीमुळे तिला संदीप रेड्डी वांगा आणि प्रभास यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातून वगळण्यात आले

कॉफी विथ करण सीझन ९’ चा पुढचा भाग कधी प्रसारित होईल?

‘कॉफी विथ करण’ सध्या त्याच्या नवव्या आणि अंतिम पर्वात आहे. करण जोहरचा हा शो दर बुधवारी संध्याकाळी जिओ हॉटस्टारवर प्रसारित होतो. अक्षय कुमार आणि रवी किशन यांच्यासोबत पुढील भाग बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us