AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द, धक्कादायक माहिती समोर

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सुत्रं आपल्या हाती घेतल्यापासून एफडीएकडून कारवाईचा धडका सुरूच आहे. आता एफडीएकडून पुण्यातील 'इंडुकेअर फार्मास्युटिकल' कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द, धक्कादायक माहिती समोर
पुण्यात एफडीएची मोठी कारवाई Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 7:12 PM
Share

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सुत्रं आपल्या हाती घेतल्यापासून एफडीएकडून कारवाईचा धडका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक अस्थापनांवर तुकाराम मुंढे यांनी कारवाई केली आहे. आता सध्या तुकाराम मुंढे यांच्या रडावर औषध उत्पादन कंपन्या असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीवर एफडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एफडीएकडून कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे.

पुण्यातील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. परवानगीशिवाय 9 औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून इंडुकेअरच्या 1.72 कोटींचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी सप्टेंबर 2026 मध्ये देखील 25 गंभीर त्रुटींमुळे ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. आता दुसऱ्यांदा ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. परवानगीशिवाय 9 औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे यांची एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कारवायांना वेग आल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला अनेक हॉटेल्स व अन्न पदार्थ जिथे तयार होतात, अशा दुकांनांवर एफडीएकडून छापे टाकण्यात आले. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा औषध कंपन्यांकडे वळवल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रोटीन पावडरवरून इशारा दिला होता. त्यानंतर आता पुण्यात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट औषधांसदर्भात माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी