AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ali Zafar : मुंबईवर दहशतवादी हल्ला अन्…पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सांगितला ‘तो’ अनुभव

Ali Zafar : 26/11 च्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी अभिनेता अली जाफर मुंबईतच होता. यादरम्यानचा अनुभव अभिनेत्यानं सांगितलं आहे.

Ali Zafar : मुंबईवर दहशतवादी हल्ला अन्...पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सांगितला 'तो' अनुभव
| Updated on: Nov 24, 2026 | 7:13 PM
Share

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफर भारतात होता. तो त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. एका मुलाखतीत अभिनेत्यानं त्यावेळचा एक पाकिस्तानी अभिनेता म्हणून आपला अनुभव सांगितला. ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या काळात भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी अभिनेते असणं ही एक सामान्य गोष्ट होती. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तो भारतात होता. चित्रपटाची कथा आणि शीर्षक बरंच वेगळं होतं.

काय म्हणाला अभिनेता?

अली जफरनं वसीम अब्बासच्या पॉडकास्टवर सांगितलं की, चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालं होतं. मग, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी चित्रीकरणाचे दोन-तीन दिवस शिल्लक होते. अलीनं सांगितलं की, एका पाकिस्तानी अभिनेत्यासाठी भारतात या चित्रपटाचं चित्रीकरण करणं ही एक मोठी गोष्ट होती. त्यानं सांगितलं की, हल्ल्यानंतर अनेक लोकांनी त्याला पाकिस्तानला परतण्याचा सल्ला दिला होता. पण, अलीचा विश्वास होता की त्यानं सुरू केलेला प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे, चित्रपट अर्धवट सोडण्याऐवजी त्यानं आपलं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

उर्वरित चित्रीकरण हैदराबादमध्ये केलं 

अलीनं पुढे सांगितलं की, मुंबई हल्ल्यानंतर चित्रपटाचं उर्वरित चित्रीकरण हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये पूर्ण झालं. यानंतर तो पाकिस्तानला परतला. पण, चित्रपट पूर्ण झाल्यानंतरही तो प्रदर्शित होण्यास बराच वेळ लागला. निर्मात्यांना चित्रपटासाठी जवळपास दोन वर्षे वितरकाचा शोध घ्यावा लागला. चित्रपटाचं एडिटिंग आणि इतर कामही सुरूच होतं. अखेरीस, 2010 मध्ये ‘तेरे बिन लादेन’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली.

अली जफरचे सिनेमे 

‘तेरे बिन लादेन’नंतर अली जफरनं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये “मेरे ब्रदर की दुल्हन,” “लंडन पॅरिस न्यूयॉर्क,” “चश्मे बद्दूर,” “टोटल सियापा,” आणि “किल दिल” “डियर जिंदगी” यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी