AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime: चेष्टा मस्करी अंगलट आली! मित्रावर नेम धरला अन् चुकून गोळी सुटली, पुढे भयंकर घडलं

डीजे व्यावसायिकाने दारूच्या नशेत बेकायदा रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यामध्ये त्याच्याकडे काम करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.. अर्जुन सुनील लाडसे असे जखमी मुलाचे नाव असून, त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur Crime: चेष्टा मस्करी अंगलट आली! मित्रावर नेम धरला अन् चुकून गोळी सुटली, पुढे भयंकर घडलं
Nagpur News
| Updated on: Nov 24, 2026 | 7:25 PM
Share

सुनील ढगे, प्रतिनिधी: वाढदिवसाच्या आनंदोत्सवाला दारूची पार्टी आणि रिव्हॉल्वरमधून फायरिंग झाल्याने रक्तरंजित वळण लागल्याची धक्कादायक घटना नागपुरातील मानेवाडा परिसरातील अध्यापक नगरात घडली. डीजे व्यावसायिकाने दारूच्या नशेत बेकायदा रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यामध्ये त्याच्याकडे काम करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अर्जुन सुनील लाडसे असे जखमी मुलाचे नाव असून, त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शैलेश हिरामण गुल्हाने असे गोळीबार करणाऱ्या डीजे व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा परिसरात वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर काही तरुणांनी दारूपार्टी केली. महाल्ले सभागृहाजवळ काही युवक एकत्र बसून गप्पा मारत होते. यावेळी शैलेश गुल्हाने आणि अर्जुन लाडसे यांच्यासह काही तरुण उपस्थित होते. यांपैकी शैलेश हा डिजे व्यावसायिक आहे. तर अर्जुन त्याच्याकडे कामाला असून, तो अकराव्या वर्गात शिक्षणही घेत आहे.

गप्पा सुरू असताना अर्जुनने वर्गातील काही मुले त्याला त्रास देत असल्याचे शैलेशला सांगितले. त्यावर शैलेशने त्याला घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत आपल्याकडे शस्त्र असल्याचा रुबाब दाखवला. त्यानंतर दारूच्या नशेत असलेला शैलेश घरात गेला आणि तेथून रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आला. उपस्थित तरुणांसमोर त्याने रिव्हॉल्व्हर काढून हवेत एक गोळी झाडली. यानंतर दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला गोळी सुटली नाही.

‘हवा करायला गेला अन् गोळी सुटली…’

त्यानंतर त्याने रिव्हॉल्व्हरची मॅगझिन काढून शस्त्र अर्जुनच्या दिशेने रोखली. मात्र, पुढच्याच क्षणी ट्रिगर दाबला गेला आणि रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी थेट अर्जुनच्या डोक्यात घुसली. या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित तरुणांची घाबरगुंडी उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्जुनला तातडीने उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चार आणि हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारवाई करत , शैलेश गुल्हाने याच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच रिव्हॉल्व्हरमध्ये आधीपासून लोड असल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमका गोळीबार कशा परिस्थितीत झाला, शस्त्र हाताळताना कोणती चूक झाली आणि दुसरी गोळी कशी सुटली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी