
बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या आयुष्यातील गोष्टींची, प्रसंगांची चर्चा होते. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारा व्यक्ती म्हणजे करण जोहर. करण जोहर कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता तो चर्चेत आहे ते त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे. त्याला अनेकांनी ट्रोलही केलं. तसेच अनेकांनी त्याची सोशल मीडियावर खिल्ली देखील उडवली. पण त्याने त्याच्या या वजन कमी करण्याच्या प्रोसेसबद्दल एका मुलाखतीत अनेक खुलासे केले. दरम्यान त्याचं अजून एका मुलाखतीमधील एक वक्तव्य फार चर्चेत आलं होतं ते म्हणजे तो त्याच्या आईसाठी अंतर्वस्त्र खरेदी करायला जातो. त्यावरून फार चर्चा देखील झाली होती.
आईसाठी अंतर्वस्त्र खरेदी करायला जात असे
करणची ही मुलाखत त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटादरम्यानची होती. चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान दिग्दर्शक करण जोहरने चित्रपटातील एका दृश्याबद्दल आणि त्याच्या आईसाठी अंतर्वस्त्र खरेदी करण्याबद्दल एक खुलासा केला होता ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं होतं. या चित्रपटात रणवीर सिंगचे पात्र ज्याचं नाव रॉकी चुरणी गांगुली आहे तो आलियाचे पात्र म्हणजे राणीच्या आईसोबत ब्रा खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. या सीनला धरून करणने त्याच्या खऱ्या आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला होता की तो देखील त्याच्या आईसाठी ब्रा खरेदी करायला जातो. त्याला कधीही त्याबद्दल कोणतीही अडचण येत नाही. आणि नाही त्याला काही अवघडल्यासारखं होतं. पण त्याच्या काही मित्रांना जेव्हा ही गोष्टी समजली तेव्हा मात्र त्यांनी नक्कीच या गोष्टीवर आक्षेप घेतला होता.
माझ्या मित्रांना हे समजलं तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला
करण म्हणाला, ‘हा कधीच निषिद्ध विषय नव्हता. मी आईसाठी ब्रा खरेदी करण्यासाठी गेलो जायचो आणि आजही कधी कधी जातो. मला कधीही त्यात काही अडचण आली नाही. पण मला माहित आहे की जेव्हा मी ते केलं तेव्हा माझ्यासोबत असलेल्या काही मित्रांना भीती वाटली की मी प्रत्यक्षात हे करत आहे. त्यांना असा प्रश्न होता की मी माझ्या एखाद्या मैत्रिणीला सांगून का ते कपडे खरेदी करून घेत नाही.”
माझ्या आईचं काम करायला दुसऱ्याला का पाठवू?
करण पुढे म्हणाला, “त्यावेळी मला असा विचार आला की, का? माझ्या आईचं काम करायला दुसऱ्याला का पाठवू? माझी आई आता 81 वर्षांची आहे आणि आता जेव्हा तिला काहीतरी हवे असते आणि मी अशा ठिकाणी असतो जिथे ती वस्तू उपलब्ध असते, तेव्हा मला तिला हवी असलेली वस्तू खरेदी करावी लागते. ती ब्रा असू शकते, किंवा दुसरी काही असू शकतं.’ तो पुढे म्हणाला की त्याला माहित होते की चित्रपटातील तो सीन काही लोकांसाठी अस्वस्थ करणारा असू शकतो, पण तोच मुद्दा मांडायचा होता.
चित्रपटातही मांडला आहे हा मुद्दा
दरम्यान हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा लोकांचंही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कौटुंबिक नाटक चित्रपट आहे, ज्यामध्ये विनोदाचा उत्तम तडका आहे. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी या चित्रपटाला थंब्स अप दिलं होतं.