
करण कुंद्रा हा एक नेहमीच चर्चेत असणार टीव्ही अभिनेता आहे. चाहते गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विशेष म्हणजे नुकताच करण कुंद्रा याने मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे. करण कुंद्रा याने मुंबईच्या बांद्रा परिसरात असलेल्या 81 Aureate बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी केलाय.

विशेष म्हणजे करण कुंद्रा याने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. हा एक अत्यंत आलिशान असा फ्लॅट असल्याचे सांगितले जात आहे.

स्वतंत्र लिफ्ट देखील या फ्लॅटला आहे. करण कुंद्रा याने त्याचा हा फ्लॅट अत्यंत खास प्रकारे डिझाईन केला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच करण या नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.

रिपोर्टनुसार करण कुंद्रा याने हा फ्लॅट तब्बल 14 कोटींना घेतला असून हा फ्लॅट 12 व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटच्या गॅलरीमधून मुंबईचा सुंदर असा समुद्र देखील दिसतो.